अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख हे कीर्तनसेवेतून जे म्हणाले ते आमच्या अभ्यासक्रमात आहे. तृप्ती देसाईंना हे कधीही कळणार नाही. प्रसिद्धीसाठी चुुुकीचे करण्याचा प्रयत्न करू नकोस.
याही उपर काही बोलायचेच असेल तर भारत सोडून पाकिस्तान किंवा इतर राष्ट्रांत जावेे लागेेेल, असा इशारा अकोल्याचे आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी भूमाता ब्रिगेेडच्या अध्यक्ष तृृप्ती देसाई यांना दिला.
ते तृृप्ती देसाईचा निषेध व समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख समर्थक मेळाव्यात ते बोलत होते. अकोल्यात भागवत संप्रदायातील लोकांनी, राजकीय पक्षांनी व सामाजिक संघटनांनी रविवारी इंदोरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ अकोले शहर व तालुका बंदचे आवाहन केले होते.
सकाळी नऊ वाजता महात्मा फुले चौकातून हजारोंच्या संख्येने निषेध मोर्चा निघाला. इंदोरी गावापासून महात्मा फुले चौक अशी सुमारे १५ किलोमीटर अंतरावरून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. बाजारतळावर मोर्चाचे रुपांतर निषेध सभेत करण्यात आले. अध्यक्षस्थानी विष्णू महाराज वाकचौरे होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com