अहमदनगर :- शिक्षणापासून कोसो दूर राहिलेल्या कोल्हाटी समाजातील अमित मारुतराव काळे हा गेल्या वर्षीच यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाला होता.
गेल्या आठवड्यातच अमित कलेक्टर झाला असून, अमित या समाजातील पहिला मुलगा आहे जो कलेक्टर झाला आहे.

नगर शहरातील बुरूडगाव रस्ता येथील काळे गल्ली येथे राहणाऱ्या अमितने जिद्द, चिकाटीच्या जोरावर ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
तमाशासाठी गावोगाव भटकंती करणारा समाज म्हणून कोल्हाटी समाजाची महाराष्ट्रभर ओळख आहे. सततच्या भटकंतीमुळे या समाजातील मुला-मुलींना शिक्षण घेता येत नाही.
मात्र, याही परिस्थितीवर मात करत ज्येष्ठ तमाशा कलावंत राजश्री काळे यांचा मुलगा अमित हा गेल्या वर्षी जिद्दीने यूपीएससी उत्तीर्ण झाला.
देशात त्याचा ८१२ क्रमांक आला आहे. अमित याचे प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले. लहानपणापासून शासकीय सेवेत जाण्याचे अमितचे स्वप्न होते.
शासकीय सेवेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सुटावेत, हा त्याचा पहिल्यापासूनच ध्यास होता. यापूर्वी त्याने परीक्षा दिल्या होत्या. मात्र, यश आले नव्हते. अनेक प्रयत्नानंतर त्याला यश आले आहे.
कोल्हाटी समाजातील अमित हा पहिला मुलगा आहे, जो यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन कलेक्टर झाला आहे.
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता दूध काढण्याच्या मशीनसाठी मिळणार इतकं अनुदान, वाचा सविस्तर
- महाराष्ट्राला लवकरच मिळणार नवीन Railway मार्ग ! ‘या’ रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले पूर्ण, 90 मिनिटांचा वेळ वाचणार
- महाराष्ट्रातील हवामानात उच्च उत्पादन देणाऱ्या कलिंगडच्या टॉप 5 जाती ! 2025-2026 मध्ये लागवडीसाठी उपयुक्त
- पुण्यातील दुसऱ्या Ring Road प्रकल्पाबाबत मोठी अपडेट! ‘या’ ७ टप्प्यांमध्ये पूर्ण होणार बांधकाम, वाचा सविस्तर
- महिन्याचा पगार इतका असेल तरच मिळणार 30 लाखांचे Home Loan ! SBI कडून होम लोन घेणाऱ्यांसाठी महत्वाचे