अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पुण्यात एका हायप्रोफाईल आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
पोलिसांनी शिवाजीनगरच्या जवळ असेल्या सेंच्युरियन हॉटेलमध्ये धाड टाकून पाच मुलींची सुटका केली आहे.
मॉन्टी उर्फ जगन्नाथ अर्यल हा एस्कॉर्टच्या माध्यमातून पुण्यात वेश्याव्यवसाय करवून घेतो, अशी माहिती समोर आली आहे.
जगन्नाथ अर्यल याने एस्कॉर्ट नंबरवर बनावट ग्राहकाद्वारे संपर्क साधून एका परदेशी महिलेला शिवाजीनगरच्या जवळ असेल्या सेंच्युरियन हॉटेलमध्ये पाठवलं होतं.
तिथं ही महिला सापडल्याने या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांना सापडलेली सदर पिडीता उझबेकिस्तान देशाची असून तिची सुटका करण्यात आली.
सदर महिलेकडून मिळालेल्या माहितीवरून बिझ्झ तमन्ना हॉटेल हिंजवडी फेस 1 येथून 5 पीडित महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर 5 पीडित महिलांपैकी 1 उझबेकिस्तान, 1 कझाकिस्तान, 1 नेपाळ, 1 ओडिसा आणि 1 पंजाब येथील राहणाऱ्या आहेत.
सेक्स रॅकेटमध्ये सामील असलेल्या महिलांना तमन्ना हॉटेलमधून ताब्यात घेवून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com