अहमदनगर लाईव्ह24 टीम / संगमनेर :– जगभरात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. देशातल्या इतर राज्यानंतर आता महाराष्ट्रातही कोरोना रुग्णाचा आकडा वाढत आहे. त्यातच शुक्रवारी सकाळी संगमनेर बसस्थानकावर कोरोनाचा रुग्ण आढळला असल्याची बातमी सोशल मीडियात पसरली.
यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण ती निव्वळ अफवा होती त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगळुरे यांनी केले आहे.
शुक्रवारी (दि. १३ मार्च) सकाळी शहरातील एका व्हॉट्सॲप ग्रुपवर दोन व्यक्तींनी ‘आत्ताच संगमनेर बसस्थानकावर कोरोनाचा रूग्ण आढळला असून त्याला संगमनेर शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.
सर्वांना विनंती आहे की, आपण गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये व तोंडाला रूमाल अथवा मास्क लावावे’ असा संदेश व्हायरल केला होता. त्यामुळे सोशल मिडीयावर काही नेटकाऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवला.
या प्रकरणी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर पोखरकर आणि घुलेवाडी ग्रामीण आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. कचोरिया यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दिला आहे.
पोलिसांनी संबंधीतांना पोलीस ठाण्यात बोलून घेतले. पुढील तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी सांगितले.
याबाबत प्रशासन सतर्क झाले असून प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम यांनी दुपारी शहरातील सर्व डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांची बैठक घेतली. याबाबत त्यांना योग्य त्या सूचना दिल्या असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com