अहमदनगर लाईव्ह24 टीम :- झारखंडच्या दुमका इथल्या लॉकडाऊनमध्ये एक लाजीरवाणी घटना घडली आहे.
लॉकडाऊनमुळे घरी परतणाऱ्या एका 16 वर्षीय विद्यार्थीनीवर 10 तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.
24 मार्च रोजी हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांना आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीतेने या प्रकरणाची पोलिसांना माहिती दिल्यानंतर सामूहिक बलात्काराचा प्रकार उघडकीस आला.
पीडितेने पोलिसांना सांगितलं की, मदतीसाठी आलेल्या मित्राने आणि त्याच्या दोन मित्रांनी माझ्यावर बलात्कार केला.
नंतर आठ जणं आली आणि त्यांनी सामूहिक बलात्कार केला. ती रात्रभर जंगलात बेशुद्ध पडली.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com