Soybean Bajarbhav : या वर्षी सोयाबीनचा (Soybean Crop) हंगाम सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांसाठी निराशाजनक ठरला आहे. एक ऑक्टोबरपासून सोयाबीनचा हंगाम (Soybean Season) सुरू झाला असून हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीन बाजारभाव (Soybean Rate) दबावात आहेत.
सोयाबीन बाजारात अतिशय कवडीमोल बाजार भाव (Soybean Market Price) मिळत असून या वर्षी सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) घट होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.
मित्रांनो सुरुवातीला पावसाचे आगमन उशिरा झाले त्यामुळे सोयाबीनचा पेरा लांबला. तसेच मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला तेथून जेमतेम सोयाबीन पीक वाचवले आणि शेवटी-शेवटी परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाची मोठी नासाडी करून ठेवले आहे.
यामुळे सोयाबीन उत्पादनात घट होणार म्हणजे होणार असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र उद्योगाकडून वेगळा दावा केला जात आहे, उद्योगाने यावर्षी सोयाबीन उत्पादकता वाढणार असल्याने सोयाबीन उत्पादन वाढेल असा उलट दावा केला आहे. यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात दबाव पाहायला मिळत आहे.
दरम्यान दीपावलीमुळे राज्यातील बऱ्याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचा लिलाव होत नसून सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना दिवाळी सण साजरा करण्यासाठी सोयाबीन खुल्या बाजारात विक्री करावा लागतो. यामुळे खुल्या बाजारात सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची सर्रास लूट केली जात असल्याचे उघड झाले आहे. मित्रांनो खरे पाहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचा दिवाळीमुळे लिलाव बंद आहे.
अशा परिस्थितीत दिवाळी सण साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची जमवाजमव करणे हेतू सोयाबीन खुल्या बाजारात विक्री करावा लागत आहे. आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रतिक्विंटल ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव मिळत होता. मात्र खुल्या बाजारात सोयाबीनला मात्र तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा नगण्य बाजार भाव मिळत आहे.
अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची खुल्या बाजारात लूट होत आहे. यामुळे जाणकार लोकांनी सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना धीर धरण्याचा सल्ला दिला असून सोयाबीन विक्रीसाठी घाई न करता ज्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे लिलाव सुरू होतील त्यावेळी सोयाबीन विक्रीचा सल्ला दिला आहे.
यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी दिवाळी सण साजरा करण्यासाठी सोयाबीन विक्री करण्याऐवजी इतर ठिकाणाहून पैशांची जमवाजमव करत आपला सण साजरा करावा आणि त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जेव्हा लिलाव सुरू होतील त्यावेळी सोयाबीनची विक्री करावी असा सल्ला जाणकार यावेळी देत आहे. निश्चितच सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी सोयाबीन विक्री करण्यासाठी घाई नाही केली तर त्यांचा फायदा होणार आहे.