Wheat Farming : मित्रांनो देशात येत्या काही दिवसात रब्बी यंदा मला सुरुवात होणार आहे. भारतात रब्बी हंगामात सर्वाधिक गव्हाची शेती केली जाते. आपल्या राज्यात देखील गहू लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. मित्रांनो खरं पाहता गहू लागवडीतून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांना गव्हाच्या सुधारित जातींची पेरणी करण्याचा सल्ला दिला जातो.
येत्या काही दिवसात राज्यात गहू पेरणीला सुरवात होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण गव्हाच्या सुधारित जातींची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया गव्हाच्या दोन सुधारित जातीची माहिती सविस्तर.
फुले समाधान (NIAW 1994):- गव्हाची ही एक सुधारित जात असून या जातीची महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. बागायती भागात वेळेवर पेरणी करण्यासाठी तसेच उशिरा पेरणी करण्यासाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान गव्हाची वेळेवर पेरणी केली जाते. तसेच 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या दरम्यान गव्हाची पेरणी करण्याचा सल्ला दिला जातो.
वेळेवर पेरणी केल्यास या जातीपासून 46 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकते. उशिरा पेरणी केल्यास या जातीपासून 44 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो. गव्हाची ही जात तांबेरा रोगास प्रतिकारक आहे. गव्हाची ही जात मावा किडीस देखील प्रतिकारक आहे. गव्हाचे हे वाण चपातीसाठी उत्तम असल्याचा दावा आहे. निश्चितच या जातीची लागवड शेतकऱ्यांना बक्कळ पैसा कमवून देणार आहे.
एनआयडीडब्ल्यू -114 :- ही देखील गव्हाची एक सुधारित जात आहे. या जातीची महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आली आहे. या जातीपासून देखील शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळणार आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या जातीपासून 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते.
गव्हाची ही सुधारित जात 115 दिवसांत उत्पादन देण्यास तयार होत असते. गव्हाची ही जात देखील तांबेरा रोगास प्रतिकारक आहे. गव्हाची ही जात शेवया कुरड्या तसेच पास्ता बनवण्यासाठी देखील सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा केला जातो. निश्चितच या जातीच्या गव्हाच्या पेरणीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई होणार आहे.