अहमदनगर ब्रेकिंग : मतिमंद तरुणाला झाली कोरोनाची लागण !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. 

आज श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धनपूर येथील एक 28 वर्षीय तरुण कोरोना बाधित असल्याचे आज समोर आले.

तहसीलदार प्रशांत पाटील यांनी ही माहिती दिली. संबंधित तरुणाच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कोरोना बाधित रुग्ण मतिमंद असून चार तारखेला त्याला फिट आल्यामुळे प्रारंभी हरेगाव येथील एका दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.

तेथून त्याला लोणी येथील प्रवरा रुग्णालयात हलवण्यात आले व त्यानंतर विळद घाट येथील विखे फाउंडेशन ला हलवले

तेथून पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे केलेल्या तपासणीदरम्यान तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.

पुणे येथून त्याचा तपासणी अहवाल मिळाल्यानंतर प्रांताधिकारी अनिल पवार. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी तातडीने उपाययोजना सुरू केल्या.

वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वसंत जमधडे यांच्या नेतृत्वाखालील पदक संबंधित तरुणाच्या संपर्कातील इतरांचा शोध घेत आहे. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment