‘होमक्वारंटाइन’च्या वादातून दोन कुटुंबात झाल्या मारामाऱ्या !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना रोखण्यासाठी होम क्वारंटाइन केलेले दत्तू कचरू सदगीर व देवराम कचरू सदगीर (दोघेही मुथाळणे) यांना ‘तुम्ही होम क्वारंटाइन आहात, बाहेर फिरू नका’,

असे सांगितल्याचा राग आल्याने या दोघांनी आपल्या घरातील १० जणांना बोलावून घेत बाळू पूंजा सदगीर यास बेदम मारहाण करत जखमी केल्याची घटना बुधवारी सकाळी मुथाळणेफाटा येथे घडली.

जखमी बाळू पूंजा सदगीर हा मुथाळणे गावाच्या माजी सरपंच अनिता बाळू सदगीर यांचा पती आहे. रविवारी पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी यांनी बाहेरगावहून

मुथाळणे येथे आलेले दत्तू सदगीर व देवराम सदगीर हे मुथाळणे फाट्यावर फिरत होते.

त्यावेळी ग्रामस्थ बाळू पूंजा सदगीर यांनी त्यांना ‘तुम्ही होमक्वारंटाइन आहात, बाहेर फिरू नका’, असे सांगितल्याचा राग आला.

दत्तू सदगीर व ऋषिकेश सदगीर यांनी बाळू सदगीर यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बाळू पूंजा सदगीरला काठ्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

गावातील किसन कारभारी सदगीर (पोलिस पाटील), शंकर दगडू सदगीर, बाळू रामकृष्ण सदगीर, सुदाम रामभाऊ सदगीर यांना व फिर्यादीची पत्नी अनिता बाळू सदगीर हिला समजले.

ते सर्वजण फिर्यादीस सोडवण्यास आले. फिर्यादीची पत्नी अनिता सदगीर यांनाही मारहाण केली. जखमी बाळू पूंजा सदगीर यांच्या फिर्यादीवरून अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment