अहमदनगर :- कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिलपर्यंत आहे.
मात्र अद्यापही भारतात कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नसल्याने तो पुढे वाढवला जाण्याचे संकेत आहेत.
लॉकडाऊन कायम राहणार, की संपणार, त्याची घोषणा कधी होणार, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
देशभरातील लॉकडाऊन वाढवायचा, काढायचा की प्रत्येक राज्यावर त्याचा निर्णय सोपवायचा, याचा फैसला उद्या होण्याची चिन्हं आहेत.
त्यामुळे प्रत्येक राज्याची भूमिका यामध्ये महत्वाची असेल.दरम्यान पंजाबने राज्यातील लॉकडाऊन आणि संचारबंदी 1 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान रेल्वे सुरु करायची की नाही, याचा अंतिम निर्णय अद्याप बाकी असल्याचं रेल्वे मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®