Turmeric Farming : हळद शेती करण्याचा बेत हाय का? मग या जातीच्या हळदीची शेती करा ; लाखोत कमाई होणार

Published on -

Turmeric Farming : अलीकडे शेतकरी बांधव हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. विशेष म्हणजे हळदीच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगला बक्कळ नफा मिळू लागला आहे. हळद हा भारतीय जेवणात वापरला जाणारा मुख्य मसाला आहे.

खरीप हंगामात इतर पिकांसोबत आंतरपीक म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव त्याची लागवड करत असतात. शेतकरी संपूर्ण शेतात हळद लागवड करू शकतात किंवा इतर पिकांसह शेताच्या उरलेल्या सावलीच्या भागात लागवड करू शकतात.

दरम्यान कृषी क्षेत्रातील जाणकार लोक शेतकरी बांधवांना हळदीच्या चांगल्या उत्पादनासाठी योग्य वाणांची पेरणी करण्याचा सल्ला देत असतात. यामुळे आज आपण हळदीच्या काही प्रगत जातींची माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत.

आर एच 5 :- ही जात इतर वाणांपेक्षा जास्त उत्पादन देत असल्याचा दावा कृषी तज्ञ करत असतात. या जातीच्या लागवडीत काही आवश्यक बाबींची काळजी घेतल्यास एकरी २०० ते २२० क्विंटल उत्पादन मिळू शकते. ही वाण तयार होण्यासाठी 210-220 दिवस लागतात. त्याची झाडे 80 ते 100 सेमी उंचीची असतात.

राजेंद्र सोनिया :- हळदीची ही देखील एक प्रगत जात आहे. ही जात १९५ ते २१० दिवसांत तयार होते. ही जात 160 ते 180 क्विंटल प्रति एकर उत्पादन देऊ शकते. त्याची झाडे 60-80 सेमी उंचीची आहेत.

पालम पितांबर :- हळदीची ही एक सुधारित जात म्हणून ओळखली जाते. ही जात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या वाणांपैकी एक आहे. या जातीपासून एकरी १३२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याचे कंद गडद पिवळ्या रंगाचे असतात.

सोनिया :- या जातीची देखील संपूर्ण भारत वर्षात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. या जातीचे हळदीचे पीक तयार होण्यासाठी 230 दिवस लागतात. ही जात 110 ते 115 क्विंटल प्रति एकरपर्यंत उत्पादन देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

सुगंधम :- ही जात 210 दिवसांत तयार होते. त्यामुळे एकरी 80 ते 90 क्विंटल उत्पादन मिळते. याचे कंद किंचित लालसर रंगाने पिवळे असतात.

सूरमा :- ही जात पक्व होण्यासाठी 210 दिवस घेते आणि एकरी 80 ते 90 क्विंटल देते. याच्या कंदांचा रंग आतून केशरी असतो. याशिवाय सुदर्शन, सगुणा, रोमा, कोईम्बतूर, कृष्णा, आर. H 9/90, RH- 13/90, पालम लालिमा, NDR 18, BSR 1, पंत पितांभ इत्यादी देखील हळदीच्या सुधारित जाती आहेत. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe