अहमदनगर :- देशाभरात लॉकडाऊनमुळे 15 दिवसांपासून दारूची दुकाने बंद आहेत. दरम्यान पंधरा दिवसांपासून दारू न मिळाल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे तळीरामांच्या हाताला काम नाही. तसेच पोटात दारू नाही. बाहेर फिरायला बंदी. त्यामुळे आपल्या मित्रांच्या गाठी-भेटी नाहीत, बैठका नाहीत. नेहमी दारू पिण्याची सवय असल्याने आता दारू मिळत नसल्याने अंगाचा थरकाप सुरू झालेला.
चिडचिड करीत अनेक तळीराम घराच्या खिडक्यांतून बाहेर डोकावत आहेत. बाहेर करोनाच्या भीतीने रस्ते निर्मनुष्य झालेत. चुकून कोणी गेला, तर पोलिसांच्या काठ्या अंगावर पडतात.
दररोज दारूच्या नशेत तुर्रर्र होऊन झिंगणाऱ्या तळीरामांची करोनामुळे चांगलीच पंचाईत झाली. त्यांच्यावर घरात निमुटपणे बसण्याशिवाय पर्याय राहीला नाही. तळीरामांच्या कुटुंबाला करोनामुळे दारू बंद असल्याचा आनंद वाटतो. पण तळीरामाच्या जीवाची घलमेल होत आहे.
कोपरगाव शहरातील दोन तळीरामांनी दारू मिळत नसल्याने वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्या पैकी एका 25 वर्षीय युवकाला अनेक दिवसांपासून पिण्यासाठी दारू मिळाली नाही म्हणून त्याने वैतागून विष प्राशन करून आपले जीवन संपवले.]
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®