Crab Farming : अलीकडे सुशिक्षित तरुण शेती व शेतीपूरक व्यवसायात पदार्पण करत आहेत. विशेष म्हणजे आपल्या ज्ञानाचा वापर करत ही तरुणपिढी इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक काम करत आहेत.
पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याच्या भुईगाव येथील एका तरुण प्रयोगशील सुशिक्षित तरुणाने देखील शेतीपूरक व्यवसायात हात आजमावला असून लाखों रुपयांची कमाई करण्याची किमया साधली आहे. या सुशिक्षित तरुणाने चक्क खेकडा पालन सुरू करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.
विकास वाजे असे या प्रयोगशील तरुणाचं नाव. या तरुणांन खेकडा पालन सुरू केले असल्याने आणि त्यातून त्याला चांगली कमाई होत असल्याने पंचक्रोशीत त्याची चांगली चर्चा होत आहे. खरं पाहता खेकड्याची मागणी अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना खेकडा विशेष प्रिय आहे.
मात्र अजूनही खेकडा पालन व्यावसायिक स्तरावर मोठ्या प्रमाणात होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा नसल्याने खेकड्याला बाजारात चांगला दर मिळतो. त्यामुळेच संधीचं सोनं करू आणि खेकडा पालनाच्या माध्यमातून मोठी कमाई करू असं विकास यांनी ठरवलं. या अनुषंगाने त्याने शेती सोबतच आधुनिक पद्धतीने खेकडा पालन सुरू केले.
विशेष म्हणजे आपल्या आपल्या पगाराच्या नोकरीवर तुळशीपत्र ठेवत या तरुणांनी खेकडा पालन सुरू केल आहे. विकास यांनी पदवीचे शिक्षण घेतले असून आयटीआय फिटर्स केल आहे. शिक्षणानंतर विकास यांनी एका खाजगी कंपनीत काम सुरू केले अन त्यांना 25000 रुपयांची नोकरी देखील होती.
मात्र, विकास यांचे नोकरीत मन रमत नसल्याने त्यांनी नोकरी सोडून शेती पूरक व्यवसाय करण्याचे धाडस केले. या अनुषंगाने त्यांनी शोधा-शोध करून खेकडा शेतीला निवडले. या अनुषंगाने त्यांनी थायलंड मधून खेकड्याच्या पेट्या मागवल्या. 1000 खेकड्याच्या पेट्या मागवून त्यांनी एक एकरात खेकडा शेती सुरू केली.
विकास सिल्ला जातीच्या खाऱ्या पाण्यात वाढणाऱ्या खेकड्याची शेती करतो. विकास हिरवी पाठ आणि लाल पाठ असलेल्या खेकड्यांचे पालन करतो. सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोकणात याची विक्री केली जाते. यातून विकासला महिन्याकाठी 60000 पर्यंतचे कमाई होत आहे. प्रत्येक डब्यात एक खेकडा असतो.
हे खेकडे कायमच पाण्यात असतात. हा खेकडा तयार होण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागतो. खेकड्यांना अन्न म्हणून माशांचे तुकडे टाकले जातात. सध्या विकास उत्पादित झालेले खेकडे स्थानिक बाजारात विकत आहे. पण भविष्यात त्याचा खेकडे एक्सपोर्ट करण्याचा मानस आहे. निश्चितच विकास यांचा हा शेती मधला भन्नाट प्रयोग इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे.