अहमदनगर – पारनेर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय तहसीलदार ज्योती देवरे यांनी एका कर्माचाऱ्यास मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बांधकाम विभागात कार्यरत असलेले चालक आबा रावसाहेब औटी यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याबाबत आबा औटी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र याबाबत तहसीलदार देवरे यांनी हा बनाव असल्याचे सांगितले.
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी शुक्रवारी सायंकाळी मला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार औटी यांनी पारनेर पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.
आपणास तहसीलदारांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा औटी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन दिवसांपुर्वी जवळा येथील वृद्ध महिलेस मारहाण केल्याचा आरोप तहसीलदार देवरे यांच्यावर झाला होता.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®