Cotton Price : आज कापूस उत्पादकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. आज कापसाच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत आज कापूस दरात जवळपास एक हजाराची घसरण झाले आहे.
त्यामुळे दरवाढीचे आशा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कापूस लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
सावनेर कृषी उत्त्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1750 क्विंटल कापसाची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 8250 रुपये किमान बाजारभाव मिळाला असून 8375 रुपये एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 8350 रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.
किनवट कृषी उत्पन्न बाजार समिती :– आज या मार्केटमध्ये 72 क्विंटल कापसाची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 7900 किमान बाजारभाव असून 8200 रुपये एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 8050 रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.
पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 80 क्विंटल एच 4 मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 8250 रुपये एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 8400 रुपये एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 8350 एवढा नमूद करण्यात आला आहे.
उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती :– आज या मार्केटमध्ये 21 क्विंटल लोकल कापसाची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 8500 रुपये एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 8550 रुपये एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे तसेच सरासरी बाजार भाव 8525 एवढा नमूद करण्यात आला आहे.
देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 200 क्विंटल लोकल कापसाची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 8400 रुपये एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 8585 रुपये एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 8450 एवढा नमूद करण्यात आला आहे.
कोपर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये असा साडेतीनशे क्विंटल लोकल कापसाची आवक झाली. आज झालेल्या लिलावात पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजारात आज 38 क्विंटल मध्यम स्टेपल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8 हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान, 8322 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि 8200 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज हिंगणघाट एपीएमसीमध्ये 962 क्विंटल मध्यम स्टेपल कापूस आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8350 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 8675 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि सरासरी दर 8460 नमूद झाला आहे.