श्रीगोंद्यातील नेत्यांना विधानसभेचे वेध,पाचपुतेंच्या पराभवासाठी जगताप – नागवडे एकत्र

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदा :- तालुक्यातील नेत्यांना विधानसभेचे वेध लागले आहेत. जि. प. महिला बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी विधानसभा लढवण्याचे संकेत नुकतेच पत्रकार परिषदेत दिले.

आमदार राहुल जगताप यांनीही नागवडे आणि आमच्यात कुठलेही मतभेद नसून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार आम्ही एकत्र राहून बबनराव पाचपुते यांचा पुन्हा पराभव करू, असे ‘बोलताना शुक्रवारी सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने उमेदवारी दिल्यास विधानसभेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवू. शरद पवार जेव्हा सांगतील, त्या वेळी राष्ट्रवादीत प्रवेश करू, असे नागवडे यांनी सांगितले होते.

याबाबत आमदार जगताप यांना विचारले असता ते म्हणाले, नागवडे कुटुंबातील वहिनी, दादा, दीपक यापैकी कुणालाही विधानसभेची उमेदवारी पवार यांनी दिली, तरी आपण त्यांचे काम करू.

याबाबत आमदार जगताप यांना विचारले असता ते म्हणाले, नागवडे कुटुंबातील वहिनी, दादा, दीपक यापैकी कुणालाही विधानसभेची उमेदवारी पवार यांनी दिली, तरी आपण त्यांचे काम करू.

मी अजून तरुण आहे. कमी वयात माझे आमदारकीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. सामान्य कार्यकर्त्यांपासून बरोबरच्या सर्वच नेत्यांनी सहकार्य केले. पाचपुतेंविरोधात आम्ही एकत्रच आहोत. त्यांना पुन्हा एकदा घरी बसवणार आहोत.

मागील विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा राहुल जगताप यांनी १३ हजार ७०० मतांनी पराभव केला होता.

आमदार झाल्यापासून जगताप यांनी तालुक्यात युवकांची मोठी फौज तयार केली आहे. चिचोंडी पाटील, वाळकी, मांडवगण, कोळगाव, येळपणे या गटात चांगली पकड निर्माण केली आहे.

नागवडे यांचे तालुक्यात शिक्षणाचे मोठे जाळे तयार आहे. तालुक्यात त्यांचे हक्काचे मतदार आहेत. शरद पवार कुणाला उमेदवारी देतात हे काही दिवसांत समजेल. पण बबनराव पाचपुते विरुद्ध आमदार जगताप अशीच लढाई होण्याची शक्यता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment