महाराष्ट्राच्या लेकीचा शेतीत चमत्कार ! 9वी पास जाधवबाई आवळा प्रोसेसिंग करून दरवर्षी करताय 25 लाखांची उलाढाल ; वाचा ही भन्नाट यशोगाथा

Ajay Patil
Published:
Farmer Success Story

Farmer Success Story : मराठवाडा म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर उभे राहतं ते दुष्काळाचे आणि शेतकरी आत्महत्येचं काळीज पिळवटणार दृश्य. पण मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या संजीवनी जाधव यांनी भूमिहीन असून देखील शेतीपूरक व्यवसायात अशी काही कामगिरी केली आहे की आज संजीवनी ताईंची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे मात्र नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्या जाधवबाईंनी आपल्या मेहनतीच्या जोरावर शेतीपूरक व्यवसायातून लाखोंची कमाई करून दाखवली आहे. त्यांनी आवळ्यावर प्रक्रिया सुरू केली आहे. खरं पाहता, त्यांचे पती एका खासगी कंपनीत रोजंदारीवर काम करत.

अशा परिस्थितीत पाच जणांच्या कुटुंबाचा खर्च भागवणे कठीण होते. यामुळे हा व्यवसाय सुरू करण्याआधी दोन पैसे घरी यावेत म्हणून संजीवनीने घरोघरी चटई आणि चादरी विकत. अशातच, तिने आपल्या कॉलनीतील 15 महिलांना सोबत घेऊन एक बचत गट स्थापन केला.

10 हजारांच्या गुंतवणुकीतून आवळा प्रक्रिया उद्योग उभारला 

जाधव बाई 2010 मध्ये कृषी विज्ञान केंद्र, जालना यांच्या संपर्कात आल्या. येथून त्यांनी आवळा प्रक्रियेचे प्रशिक्षण घेतले. कृषी विज्ञान केंद्राने संजीवनीला पूर्ण मदत केली. KVK द्वारे उत्पादित आवळा उत्पादनांचे विपणन करून संजीवनीने तिचा उद्योजकीय प्रवास सुरू केला.

यानंतर संजीवनीने स्वत: 10 हजारांच्या गुंतवणुकीतून आवळा उत्पादने बनवण्यास सुरुवात केली. त्यांनी बनवलेल्या उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळाला. ग्राहकांची मागणीही येऊ लागली.

आवळ्यापासून अनेक उत्पादने तयार करतात 

वाढती मागणी पाहून त्यांनी थेट आवळा उत्पादक शेतकऱ्यांकडून आवळा घेण्यास सुरुवात केली. आता जाधवबाई आवळा कँडी, आवळा लोणचे, आवळा सुपारी, आवळा पावडर, आवळा मुरब्बा असे अनेक पदार्थ तयार करतात. आज त्यां आवळा प्रक्रिया करण्याच्या या व्यवसायातून 30 ते 40 टक्के नफा कमवत आहेत.

100 पेक्षा जास्त आउटलेट वर विक्री होतात उत्पादने 

हे सर्व पदार्थ संजीवनीच्या घरी तयार केले जातात. तिच्या बचत गटातील महिला कोणत्याही मशीनच्या मदतीशिवाय ही उत्पादने बनवतात. भविष्यात प्रक्रिया युनिट उभारण्याची योजना आहे. सध्या 250 क्विंटल पेक्षा जास्त आवळा उत्पादने संपूर्ण महाराष्ट्रात 100 पेक्षा जास्त आउटलेटवर जातात. त्यांची वार्षिक उलाढाल सुमारे 25 लाख रुपये आहे. यातून सुमारे सहा लाख रुपयांचा नफा त्यांना मिळतो.

अनेक पुरस्कार मिळाले आहेत

संजीवनी ही जिल्ह्यातील इतर महिला आणि ग्रामीण तरुणांसाठी एक आदर्श आहे. आवळा प्रक्रिया करण्याच्या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 2014 मध्ये ‘शारदाताई पवार स्मृती पुरस्कार’, 2017 मध्ये ‘समाज भूषण पुरस्कार’ आणि 2018 मध्ये महिला किसान दिनानिमित्त ICAR तर्फे सन्मानित करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe