महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची होणार चांदी ! शास्त्रज्ञांनी विकसित केलं सोयाबीनचे नवीन वाण ; वाचा सविस्तर

Published on -

Soybean New Variety Information : सोयाबीनचे शेती भारत वर्षात मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये मध्यप्रदेश आणि आपल्या महाराष्ट्रात सोयाबीनचे उत्पादन सर्वाधिक पाहायला मिळते. राज्यातील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश म्हणजेच जवळपास सर्व विभागात या पिकाची शेती पाहायला मिळते.

राज्यात हे एक मेजर क्रॉप असून बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे. सध्या सोयाबीनचा हंगामचं सुरू आहे. राज्यातील जवळपास सर्वच विभागात सोयाबीनचीं हार्वेस्टिंग झाली असून आता शेतकरी बांधव सोयाबीन विक्रीसाठी लगबग करत आहे.

मात्र यंदा सोयाबीनला शेतकऱ्यांच्या अपेक्षाप्रमाणे दर बाजारात पाहायला मिळत नाहीये त्यामुळे शेतकरी बांधव थोडेसे असंतुष्ट असल्याचे चित्र आहे. अशातच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी देखील समोर आली आहे. विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही एक गोड बातमी राहणार आहे.

मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर घालण्यासाठी सोयाबीनचे एक सुधारित वाण विकसित केलं आहे. कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून तयार झालेलं हे सोयाबीनचं वाण स्थानिक व राष्ट्रीय तुल्यबळ जातीपेक्षा अधिक उत्पादन देत असल्याचा दावा शास्त्रज्ञांकडून यावेळी करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे हे वाण मराठवाडा विभागासाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे. या जातीच्या काही विशेषता अशा की, ही जात पेरणीनंतर अवघ्या 96 दिवसात काढण्यासाठी तयार होते. तसेच सोयाबीनची ही सुधारित जात हेक्टरी 23 क्विंटलपर्यंत उत्पादन देण्यास सक्षम आहे.

निश्चितच मराठवाडा विभागासाठी ही जात प्रसारित करण्यात आली आहे यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या नवीन जातीचा मोठा फायदा होणार असून त्यांच्या उत्पादनात वाढ आणि परिणामी उत्पन्न देखील भरभरून वाढणार आहे.

दापोली कृषी विद्यापीठाने देखील विकसित केले सोयाबीन वाण 

याशिवाय दापोली कृषी विद्यापीठाने देखील एक सोयाबीन वान विकसित केला आहे आणि याला प्रसारित करण्यासाठी नुकतीच मान्यता मिळाली आहे. या विद्यापीठाने विकसित केलेले सोयाबीन वान कोकण सात्विक वरी या नावाने ओळखले जाणार आहे.

ही जात मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या सोयाबीन जाती सारखी लवकर पक्व होणारे नसून 118 दिवसात काढण्यासाठी तयार होणार आहे. निश्चितच या जातीचा देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या दोन्ही वाणाला प्रसारित करण्यास आता मान्यता मिळाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!