Medicinal Plant Farming : खरं काय…! कोरोनामध्ये ‘या’ औषधी वनस्पतींची मागणी वाढते, म्हणून याची लागवड करा ; भरपूर नफा मिळणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Medicinal Plant Farming : जगात 2020 पासून म्हणजे जेव्हापासून कोरोना आला आहे तेव्हापासून औषधी वनस्पतींची खपत वाढली आहे. आता पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढत असून यामुळे पुन्हा एकदा औषधी वनस्पतींची खपत मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

अशा परिस्थिती शेतकरी बांधव औषधी वनस्पतींची लागवड करून चांगले कमाई करू शकणार आहेत. आता तुम्ही म्हणत असाल कोणत्या औषधी वनस्पतींची शेती केली पाहिजे. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अश्वगंधा, हळद, गिलोय या औषधी वनस्पतींची शेती करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. चला तर मग जाणून घेऊया या औषधी वनस्पतीबद्दल थोडक्यात.

अश्वगंधा एक महत्त्वपूर्ण औषधी वनस्पती :- अश्वगंधा एक महत्वपूर्ण औषधी वनस्पती असून संपूर्ण जगात याची मागणी आहे. ही औषधी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याचा दावा केला जातो. यामुळे कोरोना काळात या औषधी वनस्पतीची मागणी वाढते. लोक रात्री झोपताना या वनस्पतीची पावडर दुधासोबत ग्रहण करतात.

यामुळे मानवी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. ही एक झुडूप वनस्पती आहे. याच्या मुळांचा वास हा अतिशय उग्र अगदी घोड्यासारखा असतो म्हणून या वनस्पतीला अश्वगंधा असं म्हणतात. या वनस्पतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याची मुळे, पान, फळ आणि बिया सर्वकाही औषध म्हणून वापरतात.

यामुळे याची शेती शेतकऱ्यांसाठी अधिक लाभप्रद सिद्ध होते. एका मीडिया रिपोर्टनुसार, अश्वगंधाची लागवड केल्यास खर्चाच्या तिप्पट नफा मिळू शकतो. अश्वगंधाची लागवड जुलै ते सप्टेंबर या कालावधीत केल्यास अधिक उत्पादन मिळते. मात्र अलीकडे तंत्रज्ञानाचा वापर करून याची वर्षभर लागवड करता येणे शक्य झाले आहे. निश्चितच या वनस्पतीची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे.

हळद पण आहे महत्वपूर्ण औषधी वनस्पती :-  आपल्याकडे हळद हा एक प्रमुख मसाल्याचा पदार्थ म्हणून उपयोगात आणला जातो. हा एक मुख्य मसाला म्हणून ओळखला जातो तसाच त्याचा वापर केला जातो. याशिवाय हळद एक औषधी वनस्पती म्हणून देखील उपयोगात आणली जाते.

बाजारात हळदीची मागणी मोठ्या प्रमाणात असते. विशेषता या साथीच्या रोगात कच्च्या हळदीला बाजारात मागणी जास्त आहे. यामध्ये असलेले औषधी गुणधर्म पाहता देश विदेशातील बाजारात याला मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रात हळद लागवडीसाठी अनुकूल हवामान आहे.

यामुळे हळदीची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा मिळणार यात तिळमात्र देखील शंका नाही. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, हळदीची लागवड आपल्या भारतात प्रामुख्याने गुजरात, मेघालय, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आसाम इ. राज्यात केली जाते.

आपल्या महाराष्ट्रातील सांगली व आजूबाजूच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात याची लागवड पाहायला मिळते. याची लागवड ही मुख्यतः एप्रिल महिन्यात केली जाते. निश्चितच हळदीला बाजारात मोठी मागणी असल्याने याचे देखील शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे.

गिलॉयची शेती :- या औषधी वनस्पतीला देखील वर नमूद केलेल्या वनस्पतीप्रमाणेच बाजारात कायम मागणी असते. विशेषता कोरोना महामारीच्या काळात याची मागणी वाढते. मध्ये असलेले औषधी गुणधर्म पाहता गेल्या तीन वर्षांत गिलॉयची मागणी मोठी वाढली आहे.

विशेष म्हणजे गिलॉयला बाजारात चांगला दर मिळतो. कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, याची लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत शक्य आहे. तथापि, जर आपल्या जमिनीची माती वालुकामय चिकणमाती असेल तर या औषधी वनस्पतीच्या शेतीतून अधिक उत्पादन मिळणार आहे.

गिलॉय लागवडीसाठी फेब्रुवारी ते सप्टेंबर हा कालावधी सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा केला जातो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की जिथं गिलॉय रोप लावत आहात, तिथे पाणी साचू देऊ नका. निश्चितच बाजारात या औषधी वनस्पतीला मोठी मागणी असल्याने याची शेती शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्न कमवून देण्याचे साधन बनणार आहे.