Government Employee News : सध्या उपराजधानी नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन प्रगतीपथावर आहे. हिवाळी अधिवेशनातून राज्य कर्मचाऱ्यांना बाबत अनेक निर्णय शासनाकडून घेतले जात आहेत. राज्य कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न अधिवेशनात चर्चीले जात आहेत. यामध्ये योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागू केली जावी अशी देखील मागणी झाली होती.
मात्र राज्य शासनाने ओपीएस योजना राज्य कर्मचाऱ्यांना बहाल करता येणार नाही हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांमध्ये कुठे ना कुठे नाराजीचे सूर पाहायला मिळत आहेत. दरम्यान आता राज्यात तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे.
अशा तासिका तत्त्वांवर काम करणाऱ्या प्राध्यापकांना 600 रुपयांऐवजी आता 900 रुपये मानधन मिळणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा विधानसभेत केली आहे.
खरं पाहता राज्यात प्राध्यापकांची हजारो पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत महाविद्यालयात व विद्यापीठात तासिका तत्त्वावर काम करणारे हजारो प्राध्यापकांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.
खरं पाहता विधान परिषदमध्ये महादेव जानकर यांनी प्राध्यापक भरतीचा मुद्दा उपस्थित केला. यावर चर्चेत दरम्यान मंत्री पाटील यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना मानधन मध्ये वाढ करण्यात येईल अशी घोषणा केली. मंत्री महोदय यांच्या मते सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील भरतीसाठी वित्त विभागाने 40% पदांना मान्यता दिली आहे.
अशा परिस्थितीत पदभरती साठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र देण्याची कारवाही उद्या स्थितीत सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. सहाय्यक प्राध्यापकांच्या 3850 पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी 1492 पदे ही भरली गेली आहेत. 2088 पदे ही भरली जाणार आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
या अनुषंगाने शासनाकडून प्रयत्न केले जात असून पदभरती मधील काही निर्बंध शिथिल केले जात आहेत. निश्चितच सद्यस्थितीला तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना दिलासा देण्यासाठी शासनाने मानधन वाढीची घोषणा केली आहे जी की अशा प्राध्यापकांसाठी दिलासा देणारी सिद्ध होणार आहे.