शेतकरी पुत्राच भन्नाट संशोधन…! 10 वीत शिकणाऱ्या पवणने तयार केलं आधुनिक यंत्र, एकाच यंत्राने होणार कोळपणी, मळणी, फवारणी अन….

Ajay Patil
Published:
janla news

Jalna News : शेती व्यवसायात काळाच्या ओघात मोठा बदल झाला आहे. अलीकडे शेतीमध्ये यंत्राचा वापर वाढला आहे. पण आधुनिक यंत्रांचा शेतीमध्ये वापर वाढल्याने उत्पादन खर्च देखील दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसेंदिवस मजूर टंचाईचे प्रमाण वाढत असल्याने आधुनिक यंत्रांचा शेतीमध्ये वापर करणे आता आवश्यक बनले आहे.

मात्र अशी यंत्रे महाग असल्याने अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्यांना कृषी यंत्रांचा वापर अशक्य बनला आहे. शेतकरी बांधवांची हीच अडचण लक्षात घेऊन जालना जिल्ह्यातील दहावीत शिकणाऱ्या शेतकरी पुत्राने एक भन्नाट असं संशोधन केल आहे.

जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्याच्या येवता येथील शेतकरी कुटुंबातील अन स्वर्गीय भास्कर रावजी शिंगणे विद्यालयात दहावीचे शिक्षण घेणाऱ्या पवन राजू दळवी या विद्यार्थ्याने असे एक यंत्र तयार केल आहे ज्याच्या मदतीने कोळपणी, मळणी, फवारणी अन अशी अनेक शेतीतली कामे करणं शक्य होणार आहे. यामुळे सध्या या शेतकरी पुत्राच्या संशोधनाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे पवन ने हे यंत्र अवघ्या तीस ते चाळीस हजारात तयार केले आहे. पवनच्या या संशोधनाची औरंगाबाद मध्ये आयोजित नवसंशोधकाचे प्रयोग या प्रदर्शनात पहिल्या सात मध्ये निवड झाली आहे. विशेष म्हणजे या प्रदर्शनात एकूण 250 संशोधन प्रदर्शित झाली होती. यात पवनच हे संशोधन पहिल्या सात मध्ये सिलेक्ट झाल आहे. दरम्यान आता अटल उस्मायन केंद्राकडून त्याला पुढील संशोधनासाठी मदत पुरवली जाणार आहे. पवन ने तयार केलेले हे यंत्र बॅटरीच्या माध्यमातून चालणार आहे.

यामुळे कमी खर्चात शेतीची कामे केली जाणार आहेत. शिवाय हे यंत्र बनवण्यासाठी देखील अधिक खर्च झालेला नसल्याने शेतकऱ्यांसाठी हे परवडणार ठरणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार हे यंत्र एकदा चार्ज केल्यानंतर चार तास काम करण्यास सक्षम राहणार आहे. या एकाच यंत्राच्या माध्यमातून बियाण्याची अचूक लागवड, कोळपणी, खत पेरणी, सरी काढणे, फवारणी व पीक खुडणी अशी अनेक कामे करणे शक्य होणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व अटल उष्मायन केंद्र नीती आयोग भारत सरकार यांच्या माध्यमातून मराठवाड्यातील औरंगाबाद येथे एका शिबिराच आयोजन करण्यात आलं होतं. या तीन दिवसाच्या शिबिरात अनेक छोटे-मोठे उद्योजक, इंजिनिअर व अभियांत्रिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात पवन याने देखील सहभाग नोंदवला होता. यामध्ये नवसंशोधकानी आपल्या प्रयोगाची माहिती तसेच सादरीकरण केले होते.

या सदर शिबिराला पवन यांच्यासह एकूण २५० जणांनी सहभाग घेतला होता. यातून ३७ जणांची आयोजकांनी निवड केली. ज्यापैकी सात जणांची या शिबिरातून विजेते म्हणून निवड करण्यात आली. या प्रथम सात विजेत्यांमध्ये पवन चा देखील समावेश होता.

यामुळे त्याला आता अटल उष्मायन केंद्राकडून पुढील संशोधनासाठी हवी ती मदत मिळणार आहे. साहजिकचं या शेतकरी पुत्राने केलेले हे काम शेतकरी हिताचे असून त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe