मोठी बातमी ! 172 किमी लांब अन 22,000 कोटी खर्चाच्या पुणे रिंग रोडसाठी मूल्यांकन पूर्ण ; भूसंपादन लवकरच होणार सुरु, यासाठी स्वतंत्र कक्ष तयार

Published on -

Pune Ring Road : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड साठी अति महत्त्वाच्या पुणे रिंग रोड बाबत एक महत्त्वाची अशी माहिती समोर आली आहे. खरं पाहता पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. दरम्यान आता या रस्त्याच्या भूसंपादनासाठी गती दिली जात आहे.

मावळ आणि मुळशी तालुक्यातील एकूण 26 गावातील जमिनीचे मूल्यांकन देखील प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. दरम्यान आता सर्वांचे लक्ष भूसंपादनाकडे लागून आहे. यासाठी प्राधिकरणाकडून एक स्वतंत्र कक्ष तयार केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्यानंतर या चालू वर्षातच या रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही दोन्ही शहरे महाराष्ट्रातील औद्योगिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, पर्यटन दृष्ट्या अतिमहत्त्वाची आहेत. यामुळे या दोन्ही शहरात वाहनाची वर्दळ अधिक राहते. परिणामी शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. अलीकडे अपघातांचे देखील प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा पुणे रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला आहे. हा 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंद वर्तुळाकार रस्ता म्हणजे रिंग रोड शहरातील वाहतुकीसाठी अन दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम बनवण्यासाठी कारगर सिद्ध होणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हा रस्ता पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागला गेला आहे. पूर्व भागात मावळमधील 11, खेडमधील 12, हवेलीतील 15, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे, तर पश्चिम भागात भोरमधील 5, हवेलीतील 11, मुळशीतील 15 आणि मावळमधील सहा गावांचा समावेश राहणार आहे. या गावातील एकूण ६९५ हेक्टर जमीन संपादित पुणे रिंग रोड साठी संपादित करावी लागणार आहे. त्यानुसार जमिनींच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, आणि लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार असून यासाठी एक स्वातंत्र्य कक्ष देखील उभारला जाणार असल्याचे एका मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे.

दरम्यान याबाबत अधिकारी संदेश शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मावळ आणि मुळशी या दोन्ही तालुक्यांतील २६ गावांमध्ये संपादित करावयाच्या जमिनीचे मूल्यांकन निश्चित करण्यात आले आहे. हे मूल्यांकन निश्चित करताना जागा मालकांना, शेतकऱ्यांना विचारात घेऊन काम झाले आहे. तसेच शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रत्येक भूसंपादनासाठी स्वतंत्र मुल्यांकन निश्चित करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आता या दोन्ही तालुक्यांमध्ये लवकरच भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

खरं पाहता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विकसित केला जाणारा हा रस्ता 22 हजार कोटी रुपये खर्चून तयार केला जाणार आहे. दरम्यान पैशांच्या उभारणीसाठी कर्ज घेण्याची तयारी शासनाने दाखवली आहे. यासाठी गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ लिमिटेड (HUDCO) ने 11,000 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर देखील केले आहे. तसेच अजून पैशांची गरज भासल्यास वाढीव तरतुदीनुसार हुडकोकडून अधिक रकमेची मागणी केली जाईल.

साहजिकच भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी आवश्यक निधीची पूर्तता ही झाली आहे. यामुळे आता भूसंपादन लवकरच सुरू होईल आणि संबंधित बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली जाईल. यानंतर मग प्रत्यक्ष रस्ते बांधकामाला सुरुवात होणार आहे. पुणे रिंग रोडच्या भूसंपादनाबाबत रस्ते विभागाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी एक महत्त्वाची माहिती सार्वजनिक केली आहे. त्यांच्या मते, रिंगरोड भूसंपादनासाठी विभागीय कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.

याच्या माध्यमातून लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात आली आहे. येत्या मार्चपर्यंत भूसंपादनाचे काम पूर्ण करून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर मग प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. निश्चितच, मार्चनंतर या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा मोबदला मिळणार आहे.

तसेच भूसंपादनानंतर पुणे रिंग रोडच्या प्रत्यक्ष बांधकामाला देखील सुरुवात होणार आहे. यामुळे लवकरच या रस्त्याचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होईल आणि लवकरात लवकर हा रस्ता तयार होऊन पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी कायमची मिटेल ही आशा जाणकार लोकांनी वर्तवली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe