लॉकडाऊन कालावधीत ५७ हजार गुन्हे दाखल ;१२ हजार व्यक्तींना अटक तर ४० हजार वाहने जप्त !

Ahmednagarlive24
Published:

मुंबई :- राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.22 मार्च ते 19 एप्रिल या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 57,517 गुन्हे दाखल झाले आहेत

तर 12,123 व्यक्तींना अटक करण्यात आली असून 40,414 वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.

उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या 100 नंबर वर 73,344 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा 572 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1051 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत. तसेच विविध गुन्ह्यांसाठी 2 कोटी 20 लाख (2 कोटी 20 लाख) रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment