Rooftop Solar Yojana Maharashtra Latest News : देशात अलीकडे सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहित केले जात आहे. या अनुषंगाने शासनाकडून वेगवेगळ्या योजना देखील सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये रूप-टॉप सोलर योजना ही घरगुती ग्राहकांसाठी सुरू करण्यात आली आहे. तसेच पीएम कुसुम योजना ही शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे.
या पीएम कुसुम योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर पंप अनुदानावर उपलब्ध करून दिले जात आहेत. दरम्यान आज आपण रूप-टॉप सोलर योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेऊन घरगुती वीज ग्राहक आपल्या घराच्या छपरावर सोलर पॅनल बसवून वीज निर्मिती करू शकतात.
विशेष म्हणजे घराच्या गरजेपेक्षा अधिक वीज निर्मिती झाली तर महावितरणला ती वीज दिली जाते आणि याच्या मोबदल्यात संबंधितांना अतिरिक्त पैसे देखील मिळतात. अशा परिस्थितीत डे बाय डे या योजनेला मोठी पसंती दर्शवली जात आहे. महाराष्ट्रात सध्या 76,808 ग्राहक या योजनेअंतर्गत सौर ऊर्जेचा वापर करत आहेत.
या घरगुती ग्राहकांनी उभारलेल्या सोलर पॅनलच्या माध्यमातून 1359 मेगावॅट इतकी वीज निर्मिती सौर ऊर्जेच्या माध्यमातून होत आहे. निश्चितच, सौर ऊर्जेचा वापर हा भविष्यासाठी फायद्याचा राहणार आहे. दरम्यान आज आपण रुफटॉप सोलर योजनेअंतर्गत तीन किलोवॅटचे जर सोलर पॅनल बसवले तर किती खर्च येईल आणि यासाठी अनुदान किती मिळेल याविषयी जाणून घेणार आहोत.
रूफ टॉप सोलर योजनेअंतर्गत मिळणार अनुदान
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, रूफ स्टॉप सोलर योजना ही केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. केंद्र सरकारकडून सौरऊर्जा निर्मितीसाठी ‘रुफ टॉप सोलर’ योजना संपूर्ण देशात चालवली जात आहे. महाराष्ट्रात देखील ही योजना असून आतापर्यंत 76,808 ग्राहकांनी याचा लाभ घेत सोलर पॅनल बसवले आहेत. विशेष म्हणजे गेल्यावर्षी 20,722 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. दरम्यान, या योजनेअंतर्गत 3 किलोवॅटपर्यंत क्षमतेचे पॅनल बसवण्यासाठी सुमारे 1 लाख 20 हजार रुपये खर्च येतो.
यात 48 हजार रुपये म्हणजे 40 टक्के अनुदान हे सरकारकडून मिळते. अशा परिस्थितीत ग्राहकाला 72 हजार रुपये खर्च हा 3 किलोवॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी येत असतो. विशेष म्हणजे या घरगुती वापरासाठी बसविण्यात आलेल्या सौर पॅनलमधून ग्राहकांच्या वापरापेक्षा अतिरिक्त जास्त वीज निर्माण झाली, तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते. रात्रीच्या वेळी ही वीज ग्राहकांना पुन्हा वापरता येते.
मग महिनाअखेरीस महावितरणला दिलेली वीज आणि महावितरणची वापरलेली वीज यांचा हिशोब होतो. जाणकार लोक सांगतात की, घरगुती वापरासाठी लागणारी वीज काढून तयार होणाऱ्या अतिरिक्त विजेतून सौर पॅनल बसवण्यासाठी आलेला खर्च चार ते पाच वर्षात निघू शकतो.
म्हणजेच वीजबिल देखील ग्राहकांना येणार नाही आणि या सौर पॅनलचा खर्च देखील ग्राहकांचा चार ते पाच वर्षात भरून निघेल. अशा परिस्थितीत सध्या या योजनेसाठी ग्राहकांची पसंती लाभत असून महावितरणकडून यासाठी विषय मोहीम राबवली जात आहे.