शेतकऱ्यांचा कांदा शेतातच सडतोय

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण व शहरीभागात लॉकडाऊन करण्यात आले आहे.

लॉकडाऊनमुळे सर्व आठवडे बाजार, मार्केट कमिट्या बंद असल्याने भाजीपाल्यासह कांदा, टोमॅटो, वांगी, डाळिंब तसेच इतर कृषिमाल शेतात पडून आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

देशभरात सर्वत्र कोरोना संसर्गजन्य रोगाने ग्रामीण व शहरी भागात थैमान घातल्याने सर्व काही लॉकडाऊन झाले आहे. तसेच वाहतूकही पूर्णपणे बंद असून शेतकरी हतबल झाला आहे.

शेतातून माल निघण्याचा कालावधी व कोरोना विषाणूमुळे झालेला लॉकडाऊन एकाच वेळी झाल्याने शेतीमालाचे नुकसान होत आहे. राज्यात शेतकरी व कांदा सूञ महत्त्वाचे समजले जाते.

शेतकरी कांदा करण्यासाठी सावकराकडून कर्ज घेतात. माल बाजारात विक्री केल्यानंतर मग सावकाराला पैसे देतात. परंतु या वर्षी साकराला पैसे कोठून द्यायचे हा प्रश्न बळीराजाला पडला आहे.

बांधावरील कांदा किती दिवस संभाळायचा, कारण कांदा जास्त दिवस टिकत नसून तो एका जागेवर राहील्यास सडतो. लॉकडाऊन उघडल्यानंतर शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळेल का? या बाबत शेतकऱ्यांना चिंता वाटत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment