Health Tips : थंडीच्या दिवसात खोकला, ताप आणि सर्दी यांसारखे आजार होतात. बदलत्या हवामानामुळे झालेल्या या आजारांकडे अनेकजण लक्ष देत नाहीत. जर तुम्हीही अशी चूक करत असाल तर वेळीच सावध व्हा. नाहीतर तुम्हाला याचा खूप मोठा फटका बसू शकतो.
याच दिवसात अनेकजण चहा पितात. परंतु, हाच चहा तुम्हाला खोकला, ताप आणि सर्दी यांसारख्या आजारांपासून वाचवू शकतो. जर तुम्ही तुळशीचा चहा बनवून त्याचे सेवन केला तर तुमचे घरबसल्या हे आजार दूर जाऊ शकतात. कसे ते जाणून घ्या सविस्तर..
या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष
असा बनवा तुळशीचा चहा
तुळशीचा चहा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर एका भांड्यात पाणी उकळवून त्यात 8-10 तुळशीची पाने टाका. जर तुम्हाला हवे असेल तर त्यात थोडे आले आणि वेलचीही टाका. हा चहा आता 10 मिनिटे उकळवून गाळून प्या.
कमी प्रमाणात वापरा पाने
जर तुम्हाला तुळशीच्या चहाचे अधिक फायदे हवे असल्यास तुम्ही या चहामध्ये चहाची पाने कमी प्रमाणात वापरा. त्यामुळे तुळशीची चवही चहामध्ये येते.
साखरेच्या जागी गुळाचा वापर करा
जर तुम्ही तुळशीच्या चहामध्ये साखर टाकण्याऐवजी गुळ टाकला तर तुम्हाला अधिक फायदे मिळू शकतात. इतकेच नाही तर थंडीच्या दिवसात गुळाचा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
काळी मिरीचा करा वापर
जर तुम्हाला खोकला, सर्दी आणि घसादुखीपासून आराम मिळवायचा असल्यास तुम्ही चहामध्ये काळी मिरी मिसळू शकता. त्यामुळे चहाची चव वाढून सर्दी गायब होते.