अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील २८ व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- जिल्हा रुग्णालया आणि प्रवरा ग्रामीण रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे गुरुवारी पाठविलेल्या २८ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणी अहवाल आज रात्री प्राप्त झाले.

हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. तसेच आज आणखी १४ व्यक्तींच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत.

आज निगेटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये जामखेड, नगर आदी ठिकाणच्या व्यक्तींच्या अहवालाचा समावेश आहे.

राज्यात आज कोरोनाचे ३९४ नवीन रुग्ण आढळले

मुंबई :- आज राज्यात कोरोनाबाधित ३९४ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६८१७ झाली आहे. आज ११७ रुग्णांना घरी सोडण्यात आले 

आतापर्यंत राज्यभरात ९५७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५५५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

Maha Info Corona Website

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २ हजार १८९ नमुन्यांपैकी ९४ हजार ४८५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६८१७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख १९ हजार १६१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८,८१४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात १८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३०१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ११, पुणे येथे ५ तर मालेगाव येथे २ मृत्यू झाले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment