Sanjay raut : आज खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळ सदस्यांना चोरमंडळ म्हटल्याने विधानसभा आणि विधान परिषदेत गोंधळ झाला. यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. यामुळे विधानसभेत आशिष शेलार यांनी राऊतांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली.
यामुळे सध्या राऊत अडचणीत आले आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, राऊतांचे दहा मिनिटे पोलीस संरक्षण काढा. परत उद्या सकाळी ते दिसणार नाहीत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात राऊतांनी ‘लोकप्रभा’मध्ये लिहिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नीचे पटत नाही असेही त्यांनी म्हटले होते. रोज सकाळी बसून आम्हाला संजय राऊतांना ऐकाव लागत.
महाराष्ट्राला याची गरज आहे का? सामनाच्या आधी राऊत लोकप्रभामध्ये होते. तेव्हा शिवसेनेच्या विरोधात त्यांचे लेख असायचे, असे राणे म्हणाले. दरम्यान, विधिमंडळ नाही हे चोरमंडळ आहे, ही बनावट शिवसेना आहे. ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे, असे राऊत म्हटले होते.
त्यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आता राऊत यांच्यावर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.