उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यातील भूपगढी गावात शुक्रवारी सकाळी शेतीच्या वादातून शेतकऱयाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना घडली. शेतीच्या वादातून शेजारी राहणाऱ्या पिता पुत्रांनी या शेतकऱ्याची गोळी झाडून हत्या केली.
हत्येची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. भूपगढी येथील 52 वर्षीय संजय पुत्र कृष्णपाल शुक्रवारी सकाळी गावाबाहेर आपल्या शेतात काम करण्यासाठी गेले होते.
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार संजय शेतातील नाली साफ करत होते. त्याचवेळी शेजारील शेतातील हेमंत आणि त्याचा मुलगा तेथे आले आणि वाद घालू लागले. त्यांनी संजय यांस मारहाण केली .
तेथील मजुरांनी हे भांडण सोडविले. तदनंतर हेमंत आणि त्याचा मुलगा त्यांच्या घरातून काही वेळाने पुन्हा शेतावर आले. व संजय यांस गोळ्या घातल्या व त्यांची हत्या केली.