Punjabrao Dakh Havaman Andaj :- अहमदनगर जिल्ह्यात तीन दिवस मोठा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिला आहे.
गुरुवार दि. ६ एप्रिल पूर्वी संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात काढणीस आलेला कांदा, हरभरा व इतर पिके काढून घ्यावीत, तसेच काढलेली पिके झाकून ठेवावीत,
![Punjabrao Dakh Havaman Andaj](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/04/ahmednagarlive24-Ahmednagar-7.png)
कारण शुक्रवार दि. ७ एप्रिल ते रविवार दि. ९ एप्रिल या तीन दिवसात संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे सुरु असणाऱ्या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहास प्रसिद्ध हवामान तज्ञ व अभ्यासक पंजाबराव डख यांनी काल मंगळवारी सदिच्छा मेट दिली
यावेळी पंजाबराव डख म्हणाले की, शुक्रवार दि. ७ एप्रिल ते रविवार दि. ९ या तीन दिवसात तळेगाव दिघेसह संगमनेर तालुक्यात जोरदार पाऊस पडणार असून तत्पूर्वी शेतकऱ्यांनी आपापल्या होतात काढणीस आलेला गहू, कांदा, हरभरा पिके काढून घ्यावीत.
सध्या उशीर लागवड केलेला गहू काढणीस आला आहे. यामुळे पुन्हा राज्यातील शेतकऱ्यांवर आसमानी संकट ओढावलं आहे. मागील पंधरवड्यात राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अवकाळी पावसाने राज्यातील पिकांचे अतोनात नुकसान केले आहे.
शेतकऱ्यांनी ५ एप्रिलच्या आत गहू, मका, कांदा काढून घेणे गरजेचे असल्याचे मत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केले आहे. याबरोबरच कोकणातील आंबा शेतकऱ्यांनी देखील ७, ८, ९ एप्रिल दरम्यान काळजी घ्यावी असे डख यांनी सांगितले आहे.
राज्यात ७, ८, ९ एप्रिल दरम्यान विदर्भ व मराठवाडा विभागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील जळगाव या भागात पावसाचा जोर राहील. कांदा, हळद, मका, गहू तसेच कोकणातील आंबा पिकाची या पावसाने नुकसान होण्याची शक्यता आहे.
यामध्ये अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, संभाजीनगर, जळगाव, बुलडाणा, यवतमाळ, नांदेड, जालना, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. यानंतर सहा सात दिवस हवामान कोरडे राहील व नंतर पुन्हा १४, १५, १६ एप्रिल रोजी पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे.