‘या’ प्रसिद्ध टीव्ही सिरियलमधून इरफान खान यांनी केला होता अभिनय

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- अभिनेता इरफान खानच्या निधनाने देशभरात दुःखाची लाट पसरली आहे. या अभिनेत्याने आपल्या अभिनयाद्वारे इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

इरफान खानने टीव्ही मालिकांमधून प्रवास करत जागतिक स्टार होण्यापर्यंत खूप संघर्ष केला. जाणून घेऊयात इरफानच्या या टीव्ही शो बद्दल

चंद्रकांता :- इरफानने चंद्रकांता या सुपरहिट मालिकेत हटके लुक दिला होता. या लूकमुळे चाहत्यांना त्याने आश्चर्यचकित केले. खरंतर तो हा शो करू इच्छित नव्हता. परंतु  त्याचा मित्र आणि मालिकेचा एक भाग असलेल्या शाहबाज खानने त्यांस शोमध्ये काम करण्यास राजी केले.

चाणक्य :- इरफान खान हा 1991 मध्ये रिलीज झालेल्या चाणक्य या टीव्ही सीरियलमध्ये दिसला होता.

स्पर्श :- एका जोडप्याभोवती गुंफलेल्या या मालिकेमध्ये इरफानने नवऱ्याची  भूमिका केली होती. इरफानसमवेत या शोमध्ये मृणाल कुलकर्णी यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

डर :- इरफानने ‘सायकोलॉजिकल थ्रिलर टीव्ही’ सीरियल डर मध्येही काम केले होते. या शोची कथा अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यप यांनी लिहिली होती. या टीव्ही शोमध्ये त्याने सायको सीरियल किलरची भूमिका केली होती.

भारत एक खोज :- इरफानने श्याम बेनेगलची प्रसिद्ध मालिका ‘भारत एक खोज’ या मालिकेत अभिनय केला होता. या शोमधील इरफानचे पात्र अकबराच्या काळातील प्रसिद्ध इतिहासकार अब्द-उल-कादिर बदौनी यांचे होते.

याशिवाय इरफानने जस्ट मोहब्बत, बनेगी अपनी बात,  मानो या ना मानो या टीव्ही सीरियलमध्ये काम केले आहे. टीव्ही शो चा कंटाळा येऊ लागला आणि इरफान चित्रपटांकडे वळला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment