भारतमाला प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात सध्या सिन्नर बाह्यमार्गाच्या बांधकामासह एनएच-१६०च्या सिन्नर-शिर्डी विभागाच्या चौपदरीकरणात व्यग्र असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
या परिवर्तनकारी प्रकल्पाचे सामाजिक महत्त्व मोठे आहे. शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांसाठी समर्पित मार्ग म्हणून तो काम करेल. याव्यतिरिक्त आसपासच्या परिसरात जलद विकासाला चालना देणारे आर्थिक उत्प्रेरक म्हणूनही काम करण्यास तो सज्ज आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील शिर्डी आणि नाशिक / त्र्यंबकेश्वर या दोन प्रमुख धार्मिक शहरांदरम्यानचा प्रवासाचा वेळ लक्षणीय कमी करणे, हा या उपक्रमाचा एक प्राथमिक उद्देश आहे. याशिवाय, शाश्वततेप्रती असलेल्या आमच्या दृढ वचनबद्धतेनुसार प्रकल्पात कार्बन उत्सर्जन आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध उल्लेखनीय तंत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
यासाठी रस्त्यांच्या बांधकामात प्लास्टिक कचऱ्याचा वापर, सिमेंट ट्रिटेड बेस आणि सिमेंट ट्रिटेड सब बेस, तसेच ‘आरएपी’ वापरणे, या उल्लेखनीय पद्धतींचा समावेश असल्याचे गडकरी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाला चालना देत अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक संपर्क व्यवस्थेचे जाळे उभारण्याप्रती आमची बांधिलकी आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.