Missing Titanic Submersible : टायटॅनिकचे अवशेष पाहायला गेलेल्या पाणबुडीत अडकलेल्या सर्व ५ जणांचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

Missing Titanic Submersible :- टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी निघाल्यानंतर अचानक बेपत्ता झालेल्या टायटॅनिक पाणबुडीतील सर्व 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या लोकांमध्ये ओशनगेटचे सीईओ स्टॉकटन रश, ब्रिटिश अब्जाधीश हमिश हार्डिंग आणि पाकिस्तानी टायकून शहजादा दाऊद यांचीही नावे आहेत.

टायटन पाणबुडीतील पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याला दुजोरा देत पाणबुडी चालवणारी कंपनी ओशनगेटने श्रद्धांजली वाहिली आहे. पाणबुडीतील सर्व लोक बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी खोल समुद्रात गेले, तिथे त्यांचा संपर्क तुटला. 18 जून रोजी ओशनगेट कंपनीची ही पाणबुडी प्रवासाला निघाली होती, मात्र पहिल्या 2 तासातच संपर्क तुटला होता.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शोध पथकाला टायटॅनिक जहाजाजवळ हरवलेल्या पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. यूएस कोस्ट गार्डच्या म्हणण्यानुसार पाणबुडीचे अवशेष सापडल्यानंतर तज्ज्ञांच्या पथकाने तपास सुरू केला आहे. कॅनडाच्या एका जहाजात बसलेल्या मानवरहित रोबोटने पाणबुडीचे अवशेष शोधून काढल्याचे सांगण्यात येत आहे.

टायटन पाणबुडीवर बसलेले पाचही लोक सुप्रसिद्ध अब्जाधीश होते. त्यात ओशनगेटचे सीईओ स्टॉकटन रश, प्रिन्स दाऊद आणि त्याचा मुलगा सुलेमान दाऊद, हमिश हार्डिंग आणि पॉल-हेन्री नार्गिओलेट यांचा समावेश होता.

18 जून रोजी अमेरिकन कंपनी ओशनगेटची ही पाणबुडी टायटॅनिकचे अवशेष दाखवण्यासाठी प्रवासाला निघाली. टायटॅनिकचा टूर या भग्नावस्थेपर्यंत पोहोचणे, तिथे फिरणे आणि नंतर परत येणे हे सुमारे आठ तास चालते. टायटॅनिकच्या ढिगाऱ्याजवळ जायला दोन तास लागतात. चार तास पाणबुडी भग्नावस्थेचा परिसर दाखवते. त्यानंतर परतायलाही सुमारे दोन तास लागतात.

शोध मोहिमेत खूप अडचणी आल्या
अचानक बेपत्ता झालेली ही पाणबुडी शोधणे सोपे नव्हते. अमेरिकेच्या तटरक्षक दलाच्या प्रवक्त्याने सांगितले होते की, हे एक अतिशय कठीण बचाव कार्य आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर, या शोध मोहिमेत शोध पथकाला सर्वात मोठी समस्या भेडसावत होती ती म्हणजे पाण्यातील दृश्यमानता.वास्तविक, प्रकाश पाण्याच्या खाली फारसा जात नाही, तर पाणबुडी सुमारे 3 किलोमीटर खाली होती, अशा परिस्थितीत शोध पथकाला स्पष्टपणे दिसण्यात खूप त्रास होत होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe