Top Hotel In Pune : हे आहेत पुण्यातील टॉप हॉटेल, एका दिवसाचा राहण्याचा खर्च किती वाचा

Ahmednagarlive24
Updated:

Top Hotel In Pune:-  प्रत्येक शहराचा विचार केला तर त्या त्या शहराचे काही खास वैशिष्ट्ये असतात. मग त्या शहराच्या काही खास परंपरा, त्या शहराची लोक संस्कृती तसेच काही शहरांना त्यांच्या खाद्य संस्कृतीची देखील ओळख असते. यामध्ये जर आपण पुणे शहराचा विचार केला तर  औद्योगिक विकास असो की शैक्षणिक विकास याबाबतीत पुणे शहर खूप झपाट्याने विकसित होत आहे. कुठल्याही शहर म्हटले म्हणजे छोटी छोटी रेस्टॉरंट, हॉटेल्स एवढेच कशाला तर अगदी वडापाव किंवा चायनीज च्या गाड्या देखील खूप प्रसिद्ध असतात.

यामध्ये पुण्याचा विचार केला तर पुण्याचे मिसळ हे खूप प्रसिद्ध असून त्या ठिकाणी असलेले इटालियन तसेच चायनीज रेस्टॉरंट देखील खूप प्रसिद्ध आहेत. पुणे शहर हे आशियातील सर्वाधिक पब असलेले शहर म्हणून ओळखले जाते. इतर शहरांप्रमाणेच राहण्यासाठी अनेक हॉटेलचे पर्याय पुण्यामध्ये उपलब्ध असून लग्न समारंभ तसेच वाढदिवसासारख्या इतर पार्ट्या इत्यादी करिता देखील अनेक हॉटेल्स या महत्त्वाच्या आहेत.

परंतु या छोट्या-मोठ्या हॉटेलच्या भाऊ गर्दीत पुण्याची खास ओळख असलेल्या व चित्रपट तसेच राजकीय क्षेत्रातील मंडळी पुण्यातील ज्या हॉटेल्स मध्ये थांबतात किंवा ज्या हॉटेल्सला पसंती देतात त्यामध्ये पुण्यातील काही टॉप हॉटेलची नावे हे खूप प्रसिद्ध आहेत. त्यातील आपण काही महत्त्वाच्या हॉटेल्स, त्या ठिकाणाच्या एका दिवसाची राहण्याचे भाडे तसेच इतर सोयी सुविधा इत्यादी बद्दल माहिती घेणार आहोत.

 पुण्यातील टॉप हॉटेल्स

1- जेडब्ल्यू मेरीऑट हॉटेल ही हॉटेल पुणे शहरातील एक महत्त्वाची हॉटेल असून यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आलेले आहेत. व्हीआयपी लोकांची प्रथम पसंती असलेले पुण्यातील ज्या काही हॉटेल आहेत त्यापैकी हे एक महत्त्वाचे फाईव्ह स्टार हॉटेल आहे. जर आपण या हॉटेलचे पुण्यातील लोकेशन पाहिले तर ते मॉडेल कॉलनी शिवाजीनगर या ठिकाणी आहे. आपल्याला माहित आहे की पुणे शहरामध्ये अनेक आयटी क्षेत्रातील कंपन्या आहेत.

त्या कंपन्यांमध्ये भेट देणारे परदेशी पाहुणे तसेच अनेक सेलिब्रिटी, क्रिकेट खेळाडू इत्यादींची देखील या हॉटेलला राहण्यासाठी पसंती असते. जर आपण या हॉटेलचा एका दिवसाचा राहण्याचा खर्च पाहिला तर तो 15638 ते 17 हजार 700 रुपये इतका आहे. तसेच या हॉटेलमध्ये सलून,पब, स्विमिंग पूल आणि विविध प्रकारचे खेळाचे देखील सुविधा देण्यात आलेले आहेत.

2- कॉनराड हॉटेल ही पुण्यातील टॉप हॉटेल च्या यादीमधील दुसऱ्या क्रमांकाचे हॉटेल असून हे हॉटेल 4.6 स्टार असलेले आहे. पुणे शहरातील या हॉटेलचे लोकेशन पाहिले तर ते संगमवाडी पुणे या ठिकाणाचे आहे. या हॉटेलमध्ये जर एक दिवस राहायचे असेल तर त्यासाठी साधारण खर्च 12362 ते 15 हजार 977 रुपये इतका आहे.

3- हॉटेल हयात पुणे शहरातील ही देखील एक प्रसिद्ध हॉटेल असून पुण्यातील टॉप हॉटेलचे यादीमध्ये या हॉटेलचा देखील नंबर लागतो.  हयात हॉटेलचे लोकेशन पाहिले तर ते आगाखान पॅलेस जवळ कल्याणी नगर या ठिकाणचे आहे. या हॉटेलला 4.4 स्टार देण्यात आले असून या ठिकाणी एका दिवसाचा राहण्याचा खर्च हा ६९४४ रुपये इतका आहे.

4- रिट्स कार्लटन हे पुण्यातील टॉप फाईव्ह हॉटेलच्या यादीमधील चौथ्या क्रमांकाचे हॉटेल आहे. या हॉटेलचे पुण्यातील लोकेशन हे जयप्रकाश नगर येरवडा पुणे या ठिकाणचे आहे. या हॉटेलला 4.7 स्टार असून खूप सार्‍या सुविधा यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. जसे की स्विमिंग पूल, स्पा आणि बार यासारख्या सुविधा या हॉटेलमध्ये आहेत. या हॉटेलमध्ये एक दिवस मुक्कामी राहायचे असेल तर त्याचे भाडे साधारणपणे 16 हजार 700 रुपयांपर्यंत आहे.

5- वेस्टीन हॉटेल ही हॉटेल देखील पुणे शहरातील एक महत्त्वाची हॉटेल असून या हॉटेलचे वेगळेपण म्हणजे या हॉटेलची  आकर्षक असलेली इमारत होय. हे पुणे विमानतळापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असून कोरेगाव पार्क या ठिकाणी आहे. विमानाने येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी हे हॉटेल खूप सोयीस्कर आहे. या हॉटेलचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या हॉटेलमध्ये गोल्फ करण्याची सुविधा देण्यात आली असून उत्तम राहण्याची आणि खाण्याची देखील सोय या हॉटेलमध्ये आहे. या हॉटेलमधील एका दिवसाचा राहण्याचा खर्च हा 12 हजार रुपये इतका आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe