Electric Bike: तुमच्या बजेटमध्ये विकत घेता येईल अशी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, वाचा या स्कूटरची किंमत आणि वैशिष्ट्ये

d

 

सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. यामध्ये अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने देखील इलेक्ट्रिक स्वरूपामध्ये येत आहेत. दुचाकींचा विचार केला तर यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये अनेक कंपन्या  गुंतल्या असून अनेक वैशिष्ट्यांनी युक्त दुचाकी तसेच चारचाकीची निर्मिती या कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

यामध्ये जर इलेक्ट्रिक स्कूटरचा विचार केला तर प्रत्येकच जण आपल्या बजेटमध्ये चांगली स्कूटरच्या शोधात असतात. या अनुषंगाने इलेक्ट्रिक स्कूटरच्या अनेक पर्याय बाजारामध्ये उपलब्ध आहेत. परंतु नुकतीच एक इलेक्ट्रिक स्कूटर बिर्ला यांनी विकसित केली असून त्या स्कूटरचे नाव बिर्ला इलेक्ट्रो असे असणार आहे.

 बिर्ला इलेक्ट्रो ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असे इलेक्ट्रिक स्कूटर बिर्ला यांनी लाँच केली असून या स्कूटरला बिर्ला इलेक्ट्रो असे नाव देण्यात आलेले आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही स्कूटरची असलेली उत्तम रेंज ही होय. म्हणजेच ही स्कूटर एका चार्जवर 125 किलोमीटर अंतर कापण्यास सक्षम आहे. तसेच या स्कूटरमध्ये 60V/35Ah क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक देण्यात आला असून यामध्ये या पॅकला BLDC इलेक्ट्रिक मोटरशी कनेक्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळेही इलेक्ट्रिक स्कूटर प्रत्येक मार्गावर प्रवास करण्यास सक्षम आहे.

 फास्ट चार्जिंग सुविधेसह डिस्क ब्रेक

या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये पुढील चाकांमध्ये तसेच मागील चाकांमध्ये डिस्क ब्रेकचे उत्तम प्रकारे संयोजन देण्यात आलेले आहे. तसेच फास्ट चार्जिंगची सुविधा देखील कंपनीकडून देण्यात आलेली आहे. म्हणजे साधारणपणे दीड तासाच्या कालावधीत पूर्ण बॅटरी चार्ज करता येणे शक्य आहे. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ओडोमीटर, एलईडी लाईट, बूट लाईट तसे यूएसबी पोर्टवर स्टार्ट बटन इत्यादी वैशिष्ट्ये देण्यात आलेला आहे.

 किती आहे या स्कूटरची किंमत?

या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ही पूर्ण बजेटमध्ये असून या स्कूटरची किंमत 70000 च्या एक्स शोरूम किमती तुम्ही विकत घेऊ शकतात. कंपनीकडून या स्कूटरसाठी इंस्टॉलमेंटची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. सुलभ डाऊन पेमेंट भरून ही बाईक तुम्ही खरेदी करू शकता.