Mutual Fund SIP : 5 वर्षात 50 लाख…! जाणून घ्या कुठे करायची गुंतवणूक?

Published on -

Mutual Fund SIP : कोरोना काळानंतर लोकांमध्ये बचत करण्याची चांगली सवयी लागली आहे, नोकरदार वर्ग आपल्या पगारातून कुठे न कुठे गुंतवणूक करताना दिसतो. भविष्याचा विचार करत आता सर्वच जण गुंतवणुकीवर जास्त भर देत आहेत, गुंतवणुकीसाठी बाजारात बरेच पर्याय उपलब्ध आहेत, अशातच आज आम्ही तुम्हाला अशा एका गुंतवणुकीबद्दल माहिती देणार आहोत, ज्यात तुम्हाला चांगला परतावा मिळेल.

आज आम्ही म्युच्युअल फंड एसआयपी बद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हाला चांगला परतावा मिळेल. यामध्ये तुम्हाला दर महिन्याला तुमच्या पगारातून एक निश्चित रक्कम गुंतवावी लागेल. SIP गुंतवणुकीमुळे तुम्ही एक चांगला फंड तयार करू शकता. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी एसआयपीद्वारे गुंतवणूक करणे, आणि तुमची संपत्ती वाढवण्याचा एक चांगला मार्ग आहे. बाजारातील परिस्थितीनुसार तुम्ही तुमची SIP रक्कम वाढवू किंवा कमी करू शकता.

SIP द्वारे, दरमहा तुम्ही तुमच्या पगाराचा काही भाग गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवू शकता. तुम्हाला शेअर बाजारात थेट गुंतवणुकीची जोखीम घ्यायची नसेल, तर तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीद्वारे गुंतवणूक करू शकता. ध्येय ठेवून गुंतवणूक करणे नेहमीच योग्य असते. यामुळे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून किती परतावा हवा आहे हे कळू शकते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही 5 वर्षात 50 लाख रुपयांचा निधीही तयार करू शकता. जर तुमचे टार्गेट 5 वर्षात 50 लाख रुपये उभे करायचे असेल तर तुम्हाला काय करायचे आहे ते जाणून घेऊया.

तुम्हाला म्युच्युअल फंडात चांगले परतावा हवे असल्यास तुम्ही फ्लेक्सी कॅप फंड किंवा मल्टीकॅप फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता. हे फंड वेगवेगळ्या मार्केट कॅप्सच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. फ्लेक्सी कॅप फंड किंवा मल्टी कॅप फंड दरवर्षी 15% परतावा देतात. जर तुम्हाला 5 वर्षांत 50 लाख रुपयांचा निधी उभारायचा असेल, तर तुम्हाला या फंडांमध्ये 55,750 रुपयांची मासिक एसआयपी करावी लागेल.

HDFC फ्लेक्सी कॅप फंडाने गेल्या वर्षी 19.40% परतावा दिला आहे आणि निप्पॉन इंडिया मल्टीकॅप फंडाने गेल्या वर्षी 15.90% परतावा दिला आहे. तर, त्यांची श्रेणी सरासरी अनुक्रमे २.५९ टक्के आणि ५.९१ टक्के होती. हे दोन्ही फंड गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. या फंडांचे मालमत्ता वाटप आणि गुंतवणुकीचे धोरण यातील वैविध्य यामुळे पडत्या बाजारपेठेतही ते लवचिक राहतात.

टीप : कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदाराने त्याबद्दल पूर्ण माहिती घेतली पाहिजे. तसेच, निर्णय घेण्यापूर्वी विविध म्युच्युअल फंडांची तुलना करावी. यासह, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांनुसार आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य फंड निवडण्यास सक्षम असाल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!