Mutual Fund SIP : प्रत्येक पालक मुलीच्या भविष्याची चिंता करताना दिसतात, घरी मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या लग्नाची किंवा शिक्षणाची चिंता सुरू होते. म्हणूनच बहुतेक लोकं गुंतवणूक करणे सुरु करतात.
विशेष म्हणजे, देशातील बहुतांश लोक सुरक्षित गुंतवणूक योजनेत आपली बचत गुंतवण्यास प्राधान्य देतात. गुंतवणुकीची ही क्षेत्रे बाजारातील जोखमीच्या संपर्कात नाहीत. येथून परतावा इतका चांगला नसला तरी देखील आपली गुंतवणूक सुरक्षित असते याची हमी असते.

अशातच आज आम्ही म्युच्युअल फंडातील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनबद्दल सांगणार आहोत. गुंतवणुकीच्या या क्षेत्रात बाजारातील जोखमीचा धोका नक्कीच आहे, परंतु तुम्हाला येथून चांगला परतावा मिळू शकतो. जर तुम्हाला थोडी रिस्क घेऊन गुंतवणूक सुरू करायची असेल. तर तुम्ही तुमचे पैसे म्युच्युअल फंडात गुंतवू शकता. येथे तुम्ही 333 रुपयांची बचत करून, तुमची मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत 76.5 लाख कमावू शकता.
यासाठी तुम्हाला चांगली म्युच्युअल फंड योजना निवडावी लागेल. योजना निवडल्यानंतर, तुम्हाला दररोज 333.33 रुपयांची बचत करून दरमहा 10,000 रुपये गुंतवावे लागतील.
तुम्हाला दरमहा दहा हजार रुपयांची ही गुंतवणूक संपूर्ण १८ वर्षे करावी लागेल. याशिवाय, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर दरवर्षी अंदाजे १२ टक्के परतावा मिळेल अशी अपेक्षा करावी लागेल.
या प्रकरणात, तुम्ही मॅच्युरिटीच्या वेळी 76.5 लाख रुपये सहज गोळा करू शकता. या पैशातून तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न थाटामाटात करू शकता. याशिवाय तुम्ही हे पैसे मुलीच्या उच्च शिक्षणासाठी देखील वापरू शकता.
टीप : म्युच्युअल फंडात गुंतवलेले पैसे बाजाराच्या जोखमीच्या अधीन असतात. यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जर तुम्ही नकळत म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली. या स्थितीत तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा बाजाराच्या वर्तणुकीवरून ठरतो.