अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- दारूची दुकाने सुरू होताच नगर शहर व जिल्ह्यातील तळीरामांनी अवघ्या सात तासांत तबल दोन कोटींपेक्षा अधिक किमतीची दारू खरेदी केली.
सकाळी दुकाने उघडण्यापूर्वीच लागलेल्या तळीरामांच्या लांबच लांब रांगा सायंकाळी दुकाने बंद होईपर्यंत कायम होत्या. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात राज्य सरकारने दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला.
राज्यभरातील मद्यपींनी या निर्णयाचे स्वागत केले. पहिल्या दिवसापासूनच दारू दुकानांसमोर मद्यपींच्या रांगा लागल्या. नगरमध्ये मात्र दुसऱ्या दिवशी दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेतला.
एक दिवस उशिरा का होईना, पण दारूची दुकाने उघडल्याने नगरमधील तळीरामांच्या आनंदाला पारावार उरला नाही. दारू विकत घेण्यासाठी सकाळपासूनच लोकांच्या रांगा लागल्या. अनेकजण सकाळी आठपासूनच दुकानासमोर तळ ठोकून होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®