Systematic Investment Plan : दरमहा फक्त 5000 रुपयांची गुंतवणूक करून व्हा कोटींचे मालक !

Published on -

Systematic Investment Plan : जर तुम्हाला भविष्यात करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला आतापासूनच गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड एसआयपी लोकप्रिय पर्याय आहे. येथील परतावा देखील खूप चांगला आहे. तुमच्यासाठी माहितीसाठी, जून 2023 मध्ये देखील SIP च्या माध्यमातून 14 हजार कोटींहून अधिक गुंतवणूक आली आहे. एसआयपी हा एक असा गुंतवणुकीचा पर्याय आहे, ज्याद्वारे तुम्ही छोट्या बचतीतूनही बंपर परतावा मिळवू शकता.

जर तुम्हाला भविष्यात चांगला निधी गोळा करायचा असेल तर तुम्ही आतापासूनच गुंतवणुकीची सवयी लावली पाहिजे. तुम्ही दीर्घ मुदतीत लाखो-कोटी रुपयांचा निधी बनवू शकता. जर तुम्ही SIP मध्ये 5000 रुपये गुंतवण्याचा पर्याय निवडला तर तुम्ही 25 वर्षांत जवळपास 1 कोटी रुपयांचा फंड सहज बनवू शकता. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, अनिश्चित बाजारपेठेत दीर्घकालीन दृष्टीकोनातून SIP हा एक चांगला पर्याय असू शकतो.

समजा, तुम्ही दरमहा 5,000 रुपये वाचवले आणि तुम्हाला १२% वार्षिक परतावा मिळत असेल, तर 25 वर्षांत तुम्ही सुमारे 1 कोटीचा (94,88,175 रुपये) निधी तयार करू शकता. यामध्ये तुमची गुंतवणूक 15,00,000 रुपये असेल. तर, तर व्याज 79,88,175 असेल. पण लक्षत घ्या SIP गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे. म्हणजेच यामध्ये परताव्याची कोणतीही हमी नाही. बाजारातील चढ-उतारानुसार तुमचा परतावा कमी-अधिक असू शकतो.

SIP च्या कामगिरीवर नजर टाकली तर जून 2023 मध्ये देखील SIP च्या माध्यमातून 14,734 कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक आली. त्याच वेळी, एसआयपी खात्यांची संख्या विक्रमी 6.65 कोटी ओलांडली आहे. या वर्षी जूनमध्ये नवीन एसआयपी नोंदणी 27.78 लाखांपेक्षा जास्त होती. जे आतापर्यंतचे सर्वोच्च होते.

SIP कदाचित तुम्हाला सर्वाधिक शक्य परतावा देऊ शकत नाही, परंतु दीर्घकालीन अनिश्चित बाजारांना तोंड देण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. दरमहा 5,000 रुपये किंवा 10,000 रुपये इतकी कमी गुंतवणूक करूनही तुम्ही 10 ते 20 वर्षांमध्ये सहज 1 ते 2 कोटी रुपयांची मालमत्ता तयार करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News