Krushi Seva Kendra Licence : कृषी सेवा केंद्र कसे सुरु करायचे ? कसा काढाल परवाना ? वाचा ए टू झेड माहिती

Published on -

Krushi Seva Kendra Licence : ग्रामीण भागाचा विचार केला तर प्रामुख्याने बहुतांश लोकसंख्या शेती व्यवसायात आहे. त्यामुळे शेती व्यवसायाशी निगडित असलेले अनेक व्यवसाय ग्रामीण भागामध्ये केले जातात. शेती म्हटले म्हणजे शेतीसाठी लागणारे रासायनिक खते, बी बियाणे, कीटकनाशकांसारख्या आवश्यक कृषी निविष्ठा या प्रामुख्याने कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवल्या जातात.

त्यामुळे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला कृषी सेवा केंद्रांचा व्यवसाय दिसून येतो. परंतु कृषी सेवा केंद्र व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याकरिता अनेक आवश्यक बाबी पूर्ण करणे गरजेचे असते. या सर्व प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही खुर्ची सेवा केंद्र सुरू केले तर या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आर्थिक नफा मिळवू शकतात.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे कृषी सेवा केंद्र व्यवसाय टाकण्या अगोदर तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या परवान्यांची आवश्यकता भासते. हे परवाने तुम्हाला मिळाल्यानंतरच तुम्ही कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय सुरू करू शकता. या अनुषंगाने आपण कृषी सेवा केंद्रासाठी लागणारे आवश्यक परवाने व ते काढण्याची पद्धत इत्यादी बद्दलची महत्त्वाची माहिती घेणार आहोत.

 कृषी सेवा केंद्र परवान्याकरिता अर्ज कुठे कराल?

यामध्ये लक्षात घेण्याची महत्त्वाची बाब म्हणजे कृषी पदविका तसेच कृषी विज्ञान विषयांमध्ये बीएससी पूर्ण केलेल्या तरुण आणि तरुणींनाच कृषी सेवा केंद्राचा परवाना मिळण्याकरिता अर्ज करता येतो. याकरता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचे असते. शासनाच्या आपले सरकार या पोर्टलवर तुम्ही अर्ज करू शकतात.

अर्ज करण्या अगोदर तुम्हाला या पोर्टलवर तुमची नोंदणी करणे गरजेचे असते व नोंदणी झाल्यानंतर कृषी विभाग निवडून कृषी परवाना सेवा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे असते. अशा पद्धतीनेच तुम्ही बियाणे तसेच रासायनिक खते किंवा कीटकनाशके यांच्या विक्रीसाठीचा परवाना मिळवण्याकरिता अर्ज करू शकता.

 परवान्यानिहाय अर्जासाठी लागणारे शुल्क

तुम्हाला नेमकं कृषी सेवा केंद्रातून कशाची विक्री करायची आहे यावर तुमचा परवाना लागणारे शुल्क अवलंबून असते. साधारणपणे विचार केला तर कीटकनाशक विक्रीचा परवाना काढण्यासाठी साडेसात हजार रुपये, बियाणे विक्रीचा परवाना काढण्याकरिता 1000 रुपये आणि रासायनिक खते विक्रीचा परवाना करिता साडेचारशे रुपये शुल्क आकारले जाते.

 कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासते?

केंद्र परवाना करता तुम्हाला अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्र देखील लागतात व ते पुढील प्रमाणे..

ज्या ठिकाणी तुम्हाला दुकान उघडायचे आहेत त्या जागेचा गाव नमुना नंबर आठ, तसेच त्या जागेसंबंधी ग्रामपंचायत प्रमाणपत्र, शॉप ॲक्टचे प्रमाणपत्र, समजा तुम्ही कृषी सेवा केंद्र टाकण्यासाठी ची जी जागा घेणार आहात ती जर मालकीची नसेल तर भाडेपट्ट्याचा करार, आधार कार्ड तसेच पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो व इतर शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र आवश्यक असते.

 अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया

तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट केल्यानंतर तो जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी यांच्याकडे जातो. त्यांनी या अर्जाला मंजुरी दिल्यानंतर कृषी उपसंचालक यांच्याकडे तो अर्ज जातो व त्यांनी मंजुरी दिली की तो अंतिम मंजुरी करिता जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यांच्याकडे येतो. जिल्हा कृषी अधीक्षकांनी मंजुरी दिल्यानंतर तुम्हाला कृषी सेवा केंद्र सुरू करण्याची परवानगी मिळते.

 या व्यवसायातून तुम्ही किती नफा मिळवू शकतात?

कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून मिळणाऱ्या नफ्याचा विचार केला तर तुम्हाला कीटकनाशक विक्रीच्या माध्यमातून सात ते 13 टक्के, बियाणे विक्रीतून दहा ते अकरा टक्के आणि खतांच्या विक्रीतून तीन ते सात टक्क्यांपर्यंत नफा मिळू शकतो. साधारणपणे आपल्याला एका साधारणपणे अंदाजावरून कळू शकते. परंतु कधीकधी पावसाच्या स्थितीवर देखील खरेदी विक्री अवलंबून असल्यामुळे याचा थेट परिणाम नफ्यावर होऊ शकतो. तुमचा रोखीने किती माल विकला जात आहे किंवा उधारीने किती जात आहे या सगळ्या गणितावर देखील नफा अवलंबून असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News