Ahmednagar Politics : रोहित पवार यांच्यावर अजितदादा गटाचे आमदार सुनील शेळके आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मोठी टीका केली होती. तर, रोहित पवार यांचे कट्टर राजकीय विरोधक राम शिंदे यांनी एक नवा आरोप रोहित पवार यांच्यावर केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आधीच आमदार रोहित पवार भाजपात जाण्याच्या तयारीत होते, असा गौप्यस्फोट केला होता.
या वक्तव्याला भाजप आमदार राम शिंदे यांनी दुजोरा देत आमदार रोहित पवारांवर निशाणा साधला. आ. रोहित पवार यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिले राजकीय तिकीट ब्लॅकमेल करूनच मिळवल्याचं आ. शिंदे यांनी म्हटलंय.
आ. शिंदे म्हणाले, सन २०१७ साली त्यांनी राष्ट्रवादीला धमकी दिली होती. जिल्हा परिषदेचे तिकीट देता की, मी भाजपात जाऊ. तसेच रोहित पवार यांनी २०१९ साली हडपसरसाठी भाजपकडे तिकीट मागितलं होतं, असं भाजप आ. राम शिंदे यांनी म्हटलंय.
आ. रोहित पवार हे तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे हडपसर आणि शिवाजीनगर विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी गेले होते, असे राम शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे ३० वर्षांपासून राजकारण करतात, त्यामुळे ते नेते झाले. आपल्यात तेवढी क्षमता आहे का ? हे ओळखून वक्तव्य करावं, असा टोला राम शिंदे यांनी रोहित पवारांना लगावलाय. कोणाच्या कपाळाला कपाळ घासून यश मिळत नाही, असा खोचाक सल्लाही त्यांनी आ. रोहित पवार यांना दिलाय
आमदार सुनील शेळके आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या या आरोपांचे वादळ शमते ण शमते तोच आता भाजप आमदार आणि त्याचे राजकीय विरोधक आमदार राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर सर्वात मोठ्ठा आणि गंभीर आरोप केलाय.
सुनील शेळकेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याआधीच आमदार रोहित पवार भाजपात जाण्याच्या तयारीत होते, असा गौप्यस्फोट शुक्रवारी केला. यानंतर भाजप आमदार राम शिंदे यांनीही त्यास दुजोरा देत रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. शेळके आणि शिंदेंच्या या आरोपांना रोहित पवार काय उत्तर देणार, याकडे लक्ष आहे.