समाजातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींचे एमपीएससी किंवा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न असते व या माध्यमातून आयएएस किंवा आयपीएस किंवा इतर मोठ्या पदांवर नोकरी करण्याची इच्छा असते. परंतु आपण जर या स्पर्धा परीक्षांचा विचार केला तर हे पाहिजे तेवढे सोपे काम नाही.
जेवढ्या कठीण परीक्षा असतात त्यामध्ये यूपीएससी किंवा एमपीएससी परीक्षांचा समावेश केला जातो. दुसरी बाब म्हणजे व्यक्ती ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेते त्याच क्षेत्रामध्ये करिअर देखील करते. परंतु काही तरुण-तरुणी असे असतात की त्यांचे शिक्षणाचे क्षेत्र वेगळे असते परंतु करिअर वेगळ्याच क्षेत्रात करतात.
अगदी हीच बाब रेणुराज या डॅशिंग आयएस यांना लागू होते. त्यांनी सर्जन म्हणून सराव करत असतानाच यूपीएससीची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये त्या उत्तीर्ण झाल्या. हे यश त्यांनी कसे मिळवले व वैद्यकीय सेवा सोडून यूपीएससीची निवड का केली व अभ्यास कसा केला इत्यादीबद्दल महत्त्वाची माहिती घेऊ.
कोण आहेत रेणू राज?
रेणू राज या केरळ राज्यामधील कोट्टायम येथील रहिवासी असून त्यांचे वडील सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. रेणुराज हे 2014 च्या बॅचच्या आईएएस ऑफिसर असून एक डॅशिंग ऑफिसर म्हणून त्यांची ओळख आहे. बेकायदेशीर बांधकामे तसेच जमीन अतिक्रमण विरोधात त्यांचे काम खूप महत्त्वपूर्ण आहे.
स्वतः त्या डॉक्टर होत्या व असे असून सुद्धा त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला व महत्त्वाचे म्हणजे यूपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी दुसरी रँक मिळवली. जर आपण रेणुराज यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर त्यांचे प्राथमिक शिक्षण हे केरळ राज्यातील कोट्टाएम मधील टेरेसा हायर सेकंडरी स्कूल मध्ये पूर्ण झाले व त्यानंतर त्यांनी एका गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय अभ्यास केला.
त्यांच्या कुटुंबाचा विचार केला तर त्यांच्या दोन्ही बहिणी या डॉक्टर आहेत व विशेष म्हणजे रेणू राज यांचे पती देखील डॉक्टर आहेत. रेणुराज यांच्या मनामध्ये अगदी लहानपणापासून आयएएस ऑफिसर होण्याचे स्वप्न होते व हे स्वप्न त्यांना स्वस्त बसू देत नव्हते. परंतु वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी केरळमध्ये डॉक्टर म्हणून काम करायला सुरुवात देखील केली. परंतु डॉक्टर म्हणून काम करत असतानाच त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली.
युपीएससीची तयारी सुरू करत असताना त्यांनी दररोज तीन ते सहा तास अभ्यास केला व अभ्यासच नाही तर झोपण्यापासून तर जेवणापासूनचे वेळापत्रक तयार केले. यूपीएससीची तयारी करताना त्यांनी पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही परीक्षांची तयारी एकत्रच केली. यामध्ये प्रीलियमच्या ऑप्शनल सब्जेक्टसाठी त्यांनी कोचिंग क्लासची मदत घेतली व चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी द हिंदू मासिकाचा अभ्यास केला व मॉक टेस्ट आणि उत्तर लिखाणाची खूप मोठ्या प्रमाणावर तयारी केली.
या सगळ्या अभ्यासाच्या नियोजनाचा फायदा त्यांना परीक्षेमध्ये झाला. इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी बिपिनचंद्र व पॉलिटिक्सच्या अभ्यासाकरिता लक्ष्मीकांत, भविष्याच्या तयारी करता एनसीआरटी व चालू घडामोडी साठी पेपर आणि मासिकांचा अभ्यास करण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला देखील त्यांनी इतर विद्यार्थ्यांना दिलेला आहे. महत्वाचे म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा अभ्यास करायचा असेल तर ऑनलाईन कंटेंटचा अभ्यास करण्याचा सल्ला देखील त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेला आहे.
वैद्यकीय व्यवसाय सोडून आयएएस अधिकारी होण्याचे का ठरवले?
रेणुराज याबद्दल म्हणतात की आयएएस अधिकारी होणे हे एक लहानपणापासूनचे स्वप्न होते व सर्जन म्हणून काम करत असताना समाजातील सर्वसामान्य लोकांकरीता काहीतरी करायचे हे जाणीव अगोदर पासून मला होती. मला सर्वसामान्यांचे जीवन चांगले बनवायचे आहे व हे आईएएस अधिकारी हे करू शकते हे माझ्या मनामध्ये पक्के झाले होते व त्यानंतर मी आयएएस अधिकारी बनण्याचा निर्णय घेतला असे रेणू राज यांनी एका मुलाखतीच्या माध्यमातून सांगितले होते.
त्यांच्या मते एक डॉक्टर जर असला तर तो 50 किंवा 100 रुग्णांची मदत करू शकतो. परंतु एक नागरी सेवा अधिकारी व त्याच्या निर्णयाचा फायदा हा हजारो लोकांना होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सोडला व आईएएस होण्याचे निश्चित केले व कठीण अभ्यास करून यशदेखील मिळवले.