Money Mantra: ‘या’ चार पर्यायांचा वापर करा आणि रिटायरमेंटनंतर स्वतःकडे प्रचंड पैसा जमा करा! वाचा प्लॅनिंग

Ajay Patil
Published:
investment plan for retierment

Money Mantra:- व्यक्ती खाजगी किंवा सरकारी नोकरीत असतो किंवा एखाद्या व्यवसायात जरी असला तरी त्याला आयुष्याच्या एका ठराविक कालावधीमध्ये निवृत्ती घ्यावीच लागते. कारण वय जसजसं वाढत जाते तसं तसे शारीरिक क्षमता कमी कमी होत जाते व त्याचा परिणाम हा आपला दैनंदिन कामांवर दिसून येतो.

त्यामुळे नोकरी असो किंवा व्यवसाय यामधून व्यक्ती निवृत्ती घेतो व आयुष्याचा उर्वरित काळ हा सुखाने घालवण्याचा प्रयत्न करतो. परंतु रिटायरमेंट नंतर देखील आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला कोणावर अवलंबून राहावे लागू नये याकरिता आतापासूनच आपण आपल्या रिटायरमेंट नंतरच्या आयुष्यासाठी लागणाऱ्या पैशांची तजवीज व्यवस्थित करून ठेवणे खूप गरजेचे असते.

यासाठी साहजिकच तुम्हाला पैशांची चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करणे गरजेचे असते. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु निवृत्तीनंतर आयुष्याच्या उतारवयात चांगला पैसा तुमच्याकडे राहावा याकरिता गुंतवणूक ही चांगल्या ठिकाणी करणे गरजेचे असते व याच अनुषंगाने तुमचा वृद्धापकाळ  आर्थिक दृष्ट्या सुरक्षित रहावा याकरिता काही गुंतवणुकीचे चांगले पर्याय पाहणार आहोत.

 रिटायरमेंट नंतर आर्थिक सुरक्षितता राहावी यासाठीचे गुंतवणुकीचे उत्तम पर्याय

1- वॉलेन्टरी पब्लिक फंड अर्थात व्हीपीएफसमजा तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी याबद्दल पुरेशी माहिती असणे खूपच गरजेचे आहे. कारण या सुविधेचा फायदा फक्त नोकरदार व्यक्तीच घेऊ शकता. या अंतर्गत ईपीएफ च्या माध्यमातून जे काही फायदे मिळतात ते सर्व कर्मचाऱ्याला दिले जातात.

आपल्याला माहित आहे की तुमचा जो बेसिक पगार म्हणजेच मूळ पगार असतो त्याच्या 12% आणि महागाई भत्ता तुमच्या पीएफ खात्यामध्ये कापला जातो व तीच रक्कम तुमची कंपनी म्हणजेच नियोक्ता प्रत्येक महिन्याला खात्यात जमा करतो. परंतु तुम्ही ऐच्छिक भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून तुमच्या प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफ मध्ये तुमचे स्वतःचे योगदान वाढवू शकता. या अंतर्गत एखादा कर्मचारी त्याचे जे काही मूळ वेतन आहे त्याच्या 100% योगदान देऊ शकतात.

कारण कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विचार केला तर प्रॉव्हिडंट फंड हे गुंतवणुकीचे एक अतिशय सुरक्षित पर्याय किंवा साधन मानले जाते. या माध्यमातून जर तुम्ही दीर्घ कालावधीसाठी चांगली गुंतवणूक केली तर तुमच्या उतार वयात किंवा तुमच्या रिटायरमेंट पर्यंत यामध्ये मोठा फंड जमा होऊ शकतो. जर तुम्ही व्हीपीएफ अर्थात ऐच्छिक भविष्य निर्वाह निधीचा विचार केला तर यामध्ये तुमच्या गुंतवणुकीवर 8.15 टक्के दराने व्याज दिले जाते.

2- मॅच्युअल फंड एक उत्तम पर्याय गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय असून बरेच व्यक्ती आता गुंतवणुकीसाठी या पर्यायाचा वापर करत आहेत. अगदी कमीत कमी प्रमाणातील गुंतवणूक तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपी च्या माध्यमातून करू शकतात. एसआयपीमध्ये तुम्ही पाचशे रुपयांची गुंतवणूक करून देखील सुरुवात करू शकतात व तुमचे उत्पन्न वाढले की यामध्ये तुम्ही टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीत वाढ करू शकतात.

एसआयपीमध्ये जर तुम्ही दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला नफा आणि परतावा देखील मिळतो. जर आपण म्युच्युअल फंड एसआयपीच्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याचा विचार केला तर सरासरी 12% पर्यंत तो मिळू शकतो. कारण म्युच्युअल फंडातील परतावा हा बाजारावर अवलंबून असल्यामुळे कधी कधी या माध्यमातून अधिकचा देखील परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते.

उदाहरणच घ्यायचे झाले तर जर तुम्ही एसआयपी मध्ये प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली व एका वर्षाला याप्रमाणे तुम्ही साठ हजार रुपये गुंतवाल. अशा पद्धतीची गुंतवणूक तुम्ही 26 वर्ष सातत्याने सुरू ठेवली तर तुमची एकूण गुंतवणूक पंधरा लाख साठ हजार रुपये होते व 12% जरी सरासरी परताव्यानुसार तुम्हाला 91 लाख 95 हजार 560 रुपयाचा परतावा मिळतो. म्हणजेच तुम्ही 26 वर्षानंतर एक कोटी सात लाख 55 हजार 560 रुपयांचे धनी होतात. त्यामुळे म्युच्युअल फंड एसआयपी हा देखील गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय आहे.

3- पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड भविष्य निर्वाह निधीशी संबंधित असलेले पीपीएफ हा एक चांगला पर्याय असून नोकरदार व्यक्तीच नाहीतर यामध्ये कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकतो. सध्या पीपीएफ मधील गुंतवणुकीवर 7.1% दराने व्याज मिळत असून यामध्ये तुम्ही वर्षाला 500 ते  किमान दीड लाख रुपये जमा करू शकतात.

या योजनेचा मॅच्युरिटी अर्थात परिपक्वता कालावधी जरी 15 वर्षाचा असला परंतु यामध्ये तुम्ही पाच वर्ष याप्रमाणे वाढ देखील करू शकतात. जर तुम्ही पंधरा ऐवजी यामध्ये पाच पाच वर्षाची वाढ केली व दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली तर तुम्ही चांगला फंड तुमच्या रिटायरमेंट पर्यंत जमा करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe