अहमदनगर शहरातील ‘या’ रस्त्यासाठी 21 कोटी रूपयाचा निधी, आमदार म्हणाले विकासासाठी कटीबध्‍द …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :-नगर एमआयडीसीतील उदयोग धंदयांना चालना मिळावी यासाठी मी गेल्‍या पाच वर्षामध्‍ये राज्‍य शासनाकडे पाठपुरावा केला आहे. एमआयडीसीमध्‍ये पायाभूत सुविधा उपलब्‍ध झाल्‍यास मोठ मोठे उदयोग धंदे येण्‍यास तयार होतात.

शहराचा विकास औदयोगिक वसाहतीवर अवलंबून असतो. यासाठी नगर एमआयडीसीमध्‍ये मोठमोठे उदयोग धंदे यावे यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेच उदयोग धंदयामुळे बेरोजगारांच्‍या हाताला काम मिळते.

त्यामुळे आर्थिक उलाढाल मोठया प्रमाणात झाल्‍यास व्यवसायिकांना चालना मिळते यासाठी एमआयडीसीच्‍या विकासासाठी मी नेहमीच कटीबध्‍द आहे. निंबळक बायपास ते मनमाड बायपास रस्‍त्‍याच्‍या कामासाठी 21 कोटी रूपयाचा निधी प्राप्‍त झाला आहे.

हे काम सुरू झाले असून डिसेंबर अखेर पूर्ण होणार आहे असे प्रतिपादन आमदार श्री. संग्राम जगताप यांनी केले. निंबळक बायपास ते मनमाड हायवे पर्यतच्‍या रस्‍त्‍याच्‍या कामाची पाहणी आमदार श्री.संग्राम जगताप यांनी केली.

यावेळी नगरसेवक श्री.कुमारसिंह वाकळे, जिल्‍हापरिषद सदस्‍य श्री. माधवराव लामखडे, एमआयडीसीचे उपअभियंता श्री गणेश वाघ, आमी संघटनेचे अध्‍यक्ष श्री राजेंद्र कटारिया , श्री अशोक सोनवणे, श्री दौलत शिंदे, श्री.हनुमंत कातोरे, श्री विष्‍णू भोर, माजी नगरसेवक श्री.पोपट बारस्‍कर, श्री.ज्ञानदेव कापडे आदी उपस्थित होते.

पुढे आमदार श्री. संग्राम जगताप म्‍हणाले की, या रस्‍त्‍याच्‍या कामाच्‍या दर्जाकडे एमआयडीसी प्रशासनाने लक्ष दयावे चांगल्‍या दर्जाचा रस्‍ता झाला पाहिजे. एमआयडीसी परिसरातील दळण वळणाचे प्रश्‍न मार्गी लावण्‍यासाठी प्रयत्‍न केले आहेत.

एमआयडीसीतील हा रस्‍ता मॉडेल रस्‍ता म्‍हणून ओळखला जाणार आहे. यामध्‍ये रस्‍ता दुभाजक, फुटपाथ, स्‍ट्रीट लाईट व वृक्षारोपन मोठया प्रमाणात केले जाणार आहे. एमआयडीसी मध्‍ये मोठमोठे उदयोग आणण्‍यासाठी माझा प्रयत्‍न चालू आहे.

कोरोना संसर्ग विषाणूमुळे उदयोग धंदयावर परिणाम झाला आहे. यामधून बाहेर पडून उदयोग धंदयांना चालना देण्‍यासाठी आम्‍ही सर्वजण प्रयत्‍न करणार आहोत. उदयोग ध्ंदयावर विविध बाजारपेढा अवलंबून असतात. यासाठी एमआयडीसीच्‍या विकासासाठी प्रयत्‍न चालू आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment