Government Subsidy:- शेतीसोबत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जोडधंदे अनेक वर्षांपासून शेतकरी करत आलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पशुपालन हा व्यवसाय पूर्वापार चालत आलेला असून त्यासोबतच आता कुक्कुटपालन, शेळीपालन,
वराह पालन तसेच ससेपालन, बटेर पालन इत्यादी अनेक प्रकारचे जोडधंदे केले जात आहेत. शेतीसोबतच केल्या जाणाऱ्या या जोडधंद्यांचे महत्त्व शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून देखील अनेक योजना राबवून शेतकऱ्यांना जोडधंद्यांसाठी प्रोत्साहन दिले जाते.
या योजनेच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करण्यात येते व त्या माध्यमातून शेतकऱ्यांना जोडधंद्यांसाठी लागणारे आवश्यक बाबी पूर्ण करता येणे सुलभ होते. जर आपण महाराष्ट्र सरकारचा विचार केला तर पशुपालन व्यवसायाला चालना देण्याकरिता अनेक योजना असून यामधीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे राष्ट्रीय पशुधन अभियान होय.
या अभियानामध्ये आता 40 टक्के अनुदानावर शेळी तसेच कुक्कुटपालन व वराह पालन व्यवसाय उभारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याच बाबतीत आपण या लेखात माहिती बघणार आहोत.
या जोडधंद्यांना मिळेल 50 लाखापर्यंत अनुदान
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या अंतर्गत आता 40 टक्के अनुदानावर शेळीपालन तसेच कुक्कुटपालन व वराह पालन करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली असून यासोबतच गुरासाठी चारा निर्मिती करण्याकरिता देखील अनुदान या माध्यमातून मिळणार आहे.
या अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज केल्यास 2026 पर्यंत लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे. त्यामध्ये विशेष असे आहे की ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेती आहे अशा शेतकऱ्यांना खूप चांगली संधी उपलब्ध होणार आहे. या अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनेमध्ये 50 टक्के अनुदानाची सोय उपलब्ध असून दहा टक्के लाभार्थ्याला स्वहिस्सा भरावा लागणार आहे.
कुक्कुटपालनासाठी असणाऱ्या अनुदानाचे स्वरूप
या अभियान अंतर्गत कुक्कुटपालनामध्ये 1000 मांसल पक्षी, दोन शेड तसेच अंडी उबवण यंत्र असा 50 लाखापर्यंतचा प्रोजेक्ट उभारण्याची संधी उपलब्ध करण्यात आली असून यामध्ये पन्नास टक्के अनुदान व दहा टक्के स्वतःचा हिस्सा असणार आहे.
शेळी गटाकरिता असलेल्या योजनेचे स्वरूप
यामध्ये 100 शेळ्या व पाच बोकड असा गट तयार करण्याकरिता वीस लाखापर्यंतचा प्रोजेक्ट उभारता येणार आहे. यामध्ये मिळणारे अनुदान व स्वतःचा हिस्सा वगळता इतर रक्कम उभारण्याकरिता कर्ज प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.
या सगळ्या खर्चामध्ये शेळ्यांसाठी शेड आणि लागणारा चारा याची देखील सोय करावी लागणार आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे दोनचे शेळ्या व दहा बोकड करिता चाळीस लाखांचा प्रोजेक्ट असणार असून या पटीत एक कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकल्पाला शासन अनुदान देणार आहे.
गुरांसाठी चारा निर्मितीला देखील मिळेल अनुदान
राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या माध्यमातून पशुधनाला जो काही चारा लागतो त्याकरिता देखील म्हणजेच प्रामुख्याने मूरघास व टीएमआर निर्मितीचा प्रकल्प उभारला तर 50 लाखापर्यंतचा प्रकल्प या माध्यमातून उभारता येणे शक्य आहे. याकरिता 50 टक्के अनुदान व दहा टक्के स्वतःचा हिस्सा भरावा लागणार असून यामध्ये एक गोदाम तसेच मशीन व चारा निर्मिती करिता आवश्यक जमिनीची आवश्यकता असणार आहे.
वराहपालनाकरिता देखील मिळेल अनुदान
या अभियानांतर्गत रोजगार निर्मिती तसेच उद्योजकता विकास, पशुधनाच्या वंशावळीमध्ये सुधारणा करणे, पशुपासूनच्या उत्पादकतेत वाढ करणे इत्यादी गोष्टी अपेक्षित आहेत. या माध्यमातून कुक्कुटपालन तसेच शेळी व मेंढी पालन वराह पालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास तसेच पशुखाद्य व वैरण उद्योजकता विकास याकरिता देखील अर्ज करता येणे शक्य आहे.
कुठे कराल अर्ज?
या अभियानांतर्गत लाभासाठी तुम्ही www.udyammitra.gov.in संकेतस्थळावर किंवा पोर्टलवर थेट ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच शेतकऱ्यांना याबाबत काही अधिकची माहिती किंवा काही अडचणी येत असेल तर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे संपर्क साधून पशुसंवर्धन विभागाची मदत याकरता तुम्हाला घेता येऊ शकते.