Spiny Gourd Farming: एका एकरातून होईल लाखो रुपयांची कमाई! करटोलाच्या ‘या’ वाणांची करा लागवड आणि मिळवा 8 ते 10 वर्ष पैसा

Ajay Patil
Published:

Spiny Gourd Farming:- शेतीमध्ये वेगवेगळ्या पिकांची लागवड आणि तंत्रज्ञानाचा वापर आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे अनेक वेगळ्या पद्धतीची पिके शेतकरी घेऊन उत्पादन तर भरघोस घेतच आहेत परंतु त्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न देखील चांगले मिळवत आहेत. पारंपारिक पिकांच्या ऐवजी आता आधुनिक पद्धतीची पिके म्हणजेच यामध्ये विदेशी भाजीपाला लागवड असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागांची लागवड यामध्ये शेतकरी आता खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करताना दिसून येत आहेत.

परंतु यामध्ये जर आपण विचार केला तर भाजीपाला आणि फळ पिकांव्यतिरिक्त रानभाजी वर्गातील करटोली सारख्या पिकाची लागवड केली तर या माध्यमातून देखील खूप मोठ्या प्रमाणावर पैसा मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. कारण करटोल्याचे औषधे गुणधर्म पाहता याला बाजारपेठेत खूप मोठी मागणी असते व 100 ते 200 रुपये किलो पर्यंत देखील याची विक्री होत असते.

पावसाळ्यामध्ये ज्या काही रानभाज्या बाजारात विक्रीसाठी दाखल होतात त्यामध्ये कर्टुले ही रानभाजी खूप मोठ्या प्रमाणावर विक्री होते. परंतु जर व्यावसायिक स्तरावर जर कर्टुल्याची लागवड करायची असेल तर शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे ठरू शकते.

कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न मिळण्यासाठी कर्टुला लागवड शेतकऱ्यांना वरदान ठरेल हे मात्र निश्चित. विशेष म्हणजे याचे एकदा रोप तुम्ही लावले तर आठ ते दहा वर्ष या माध्यमातून उत्पादन मिळत राहते. दृष्टिकोनातून आपण या लेखात कर्टुले लागवड कशी करावी याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती घेऊ.

 करटोली लागवडीकरिता हवामान माती कशी असावी?

करटुले लागवडीकरिता ओलसर हवामान आवश्यक असते व 1500 ते 2500 मिली पाऊस असावा. तसेच 20 ते 30 अंश सेंटीग्रेड दरम्यान तापमाना राहिले तर रोपांची वाढ चांगली होते. तसेच कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये याची लागवड करता येऊ शकते. परंतु सेंद्रिय पदार्थ जास्त प्रमाणात असलेली वालूकामय जमीन याकरिता योग्य ठरते. तसेच कर्टुला लागवडीकरिता याचे अनेक सुधारित वाण देखील असून यामध्ये इंदिरा कानकोड-1, अंबिका-12-1, अंबिका-12-2 आणि अंबिका-12-3 या जाती लागवडीकरिता आणि जास्त उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.

 पेरणी तसेच खत कीटकनाशक व्यवस्थापन कसे करावे?

करटोल्याची लागवड करायची असेल तर शेताची नांगरणी करून त्यामध्ये सपाट असलेल्या शेतात रोपे लावण्याकरिता खड्डे तयार करून घेणे गरजेचे आहे व या खड्ड्यामध्ये बिया लावल्या जातात. पेरणी करण्या अगोदर खत आवश्यक असून पेरणी करण्यापूर्वी नांगरणीच्या वेळी 200 ते 250 क्विंटल प्रती हेक्टर कुजलेले शेणखत मातीत मिसळून घ्यावे.

त्याशिवाय 65 किलोग्रॅम युरिया, 375 एसएसपी आणि 67 किलोग्रॅम प्रती हेक्टर एमओपी द्यावे. तसेच या पिकावर फारच कमी प्रमाणात रोग आढळतात. परंतु माशी हा कीटक याची जास्त नुकसान करते म्हणून दोन ते तीन मिली इमिडाक्लोप्रीड किंवा क्विनॉलफॉस एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे आवश्यक आहे.

 या औषधी गुणधर्मामुळे असते बाजारपेठेत खूप मागणी

कर्टुल्यांमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मांचा विचार केला तर यामध्ये प्रोटीन आणि आयर्न हे मुबलक प्रमाणात असतात व कॅलरीज अत्यल्प असतात. याशिवाय यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि फायबर देखील मुबलक असतात. तसेच कर्टुल्याची भाजी पचायला खूप हलकी असते तसेच मधुमेही

साठी देखील हे खूप फायदेशीर आहे. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास खूप मोठी मदत होते. एवढेच नाही तर कॅन्सर व हृदयविकार सारख्या गंभीर आजारांचा धोका देखील कमी होण्यास मदत होते. या औषधी गुणधर्मामुळेच बाजारपेठेत कर्टुल्याला खूप मोठी मागणी असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe