मजुरांची दैना! दोघांचा वाटेत मृत्यू तर एकाने मारली नदीत उडी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- लॉकडाऊन घोषित केल्यानंतर देशभरात मजूर अडकून पडले. यातील बराचश्या मजुरांनी पायी प्रवास सुरु केला व घर गाठले. परंतु हा खडतर उपाशी प्रवास सर्वानाच सहन होत नाही.

या काळात उपासमारी आणि भुकेमुळे कोणत्याही मजुराचा मृत्यू होणार नाही, असे मोदी सरकारनं आश्वासन दिले परंतु मजुरांची दैना काही संपेना.

आता उपाशीपोटी चालत जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांचा वाटेतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर एकाने नदीत उडी मारून जीव दिला. मुंबईहून उत्तर प्रदेशात आपल्या गावाकडे उपाशीपोटी चालत जाणाऱ्या दोन परप्रांतीय मजुरांचा मुक्ताईनगरजवळ मृत्यू झाला.

तर एका व्यक्तीने पूर्णा नदीच्या पात्रात मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह दोनतीन दिवसांपासून पाण्यात होता. त्यामुळे मृताची अद्याप ओळख पटलेली नाही.

मात्र, या व्यक्तीने उपासमारीला कंटाळून नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे बोललं जात आहे. . हे परप्रांतीय मजूर आपल्या नातेवाईकांसह त्यांच्या गावी परत जात असताना अचानकपणे दोघांची प्रकृती खालावली.

त्यातच दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेले लाखो मजूर आपल्या कुटुंबीयासह महाराष्ट्रातून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात स्थलांतर करत आहे. काही मजूर मिळेल त्या वाहनाने तर बहुतांश मजुरांनी पायी चालत जाणं पसंत केलं आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment