आज देशभरात विचार केला तर वाहनांची संख्या भरमसाठ वाढली आहे. गेल्या महिन्याचाच विचार केला तर लाखो वाहनांची विक्री गेल्या एकाच महिन्यात झाली आहे. सर्वजण आपल्या वाहनांचे इन्शुरन्स उतरवत असतात. जेणे करून काही अडचण झाल्यास किंवा अपघाती घटना घडल्यास विमा मिळेल. परंतु आता सध्या दिवाळीचा सीजन सुरु आहे. सगळीकडे फटाके फुटत आहेत. जर कधी गाडीला फटाक्यांमुळे आग लागली तर विमा कंपनी ही भरपाई कशी देणार ? क्लेम करता येतो का? चला जाणून घेऊयात सविस्तर..
सर्वात आधी इन्शुरन्सचे किती प्रकार आहेत ते जाणून घेऊयात –सर्वात आधी इन्शुरन्सचे प्रकार पाहू. यात तीन प्रकार असतात. थर्ड पार्टी इन्शुरन्स, कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स आणि स्टँड अलोन इन्शुरन्स. अपघाताच्या वेळी पहिला विमा वापरला जातो. तर दुसरा आणि तिसरा इन्शुरन्स हा आग किंवा कोणत्याही स्फोटक द्रव्यामुळे गाडीला झालेल्या नुकसानीसाठी वापरला जातो. त्यामुळे, विमा कंपनी तुमच्यासाठी दुसरा आणि तिसरा विमा आगीच्या घटना झाल्यास लागू करते.
क्लेमसाठी अशी असते प्रोसेस :-असे समजा कि तुमच्या वाहनाबाबत काही अनुचित प्रकार घडला आहे. अशा वेळी लगेच इन्शुरन्स एजंटला कळवा. त्वरित एफआयआर दाखल करा. विमा कंपन्या क्लेम करायच्या आधी एफआयआरची छायाप्रत मागतात. यानंतर जर तुमचा क्लेम बरोबर असेल तर विमा कंपनी क्लेम पस करेल. तुमची सर्व कागदपत्रे एजंटकडे सोपवा. त्यानंतर अल्पावधीतच क्लेम जमा होईल.
क्लेम रिजेक्ट होण्याची काय आहेत कारणे :- आता अनेकांची ही समस्या आहे की विमा कंपन्या क्लेम कधी व का फेटाळून लावतात. तर याचे असे आहे की, बॅटरीमध्ये बिघाड, गॅस किटमुळे लागलेली आग किंवा वाहनाच्या अंतर्गत वायरिंगच्या समस्येमुळे काही नुकसान झाल्यास इन्शुरन्स क्लेम मिळत नाही. त्यासाठी आपण योग्य पद्धतीने इंशुरन्स घेणे व योग्य पद्धतीने क्लेम करणे गरजेचे आहे. जेणे करून तुम्हाला तुमची भरपाई व्यवस्थित मिळेल.