Shani Dev : ज्योतिष शास्त्रात ग्रह आणि कुंडलीला खूप महत्व दिले जाते. ग्रहांचा माणसाच्या जीवनावर खूप खोलवर परिणाम होतो. ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याचा पृथ्वी आणि मानवी जीवनावर परिणाम दिसून येतो. अशातच नऊ ग्रहांमध्ये शनिदेवाला महत्वाचे स्थान आहे.
शनिदेवाला कर्म ग्रह मानले गेले आहे, जो व्यक्तीच्या कर्मांवर नजर टाकतो आणि त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. शनि हा न्यायाचा ग्रहही मानला जातो, कारण त्याचाही माणसाच्या जीवनात न्याय आणि धर्माचा प्रभाव पडतो. शनीची सध्याची स्थिती जाणून घेतल्यास, व्यक्तीच्या जीवनातील परिणामांचा अंदाज लावता येतो. सध्या शनी कुंभ राशीत आहे. आणि तो 2024 पर्यंत तिथेच राहणार आहे.
दरम्यान येत्या वर्षात म्हणजेच 2024 मध्ये कुंभ राशीत शनी मार्गी होईल. 29 जून ते 15 नोव्हेंबरपर्यंत शनि मार्गी अवस्थेतच असेल. त्याच वेळी 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत शनि अस्त स्थितीत येईल तर 18 मार्च रोजी तो उदित होईल, यामुळे 3 राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी चला पाहूया.
मेष
मेष राशीच्या लोकांना शनीच्या स्थितीतील बदलामुळे खूप फायदा होणार आहे. या काळात व्यक्तीला विविध प्रकारचे परिणाम मिळू शकतात. तुमच्या कृतीमुळे समाजात तुमचा सन्मान वाढेल. आर्थिक स्थिती चांगली होईल. तुम्हाला करिअरमध्ये तुम्हाला खूप फायदे होतील. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.
मकर
मकर राशीसाठी, शनीची उदय स्थिती करिअरमध्ये मोठे बदल घडवून आणू शकते. या काळात काही लोकांना नोकरी बदलण्याची संधी मिळू शकते. हा काळ करिअरच्या प्रगतीसाठी संधी देऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या कुटुंबापासून दूर असाल आणि त्यांना वेळ देऊ शकत नसाल तर यावेळी तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
वृषभ
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने वृषभ राशीमध्ये शनिची उदय स्थितीची वेळ खूप महत्वाची असू शकते. या काळात, व्यक्ती आर्थिक स्थिरता आणि यश प्राप्त करेल असे चिन्ह देखील असू शकते. या काळात लोकांना व्यवसाय आणि नोकरीत बढती मिळेल. काही लोकांना या संक्रमणातून हळूहळू प्रत्येक क्षेत्रात परिणाम मिळू शकतात.