अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- करंजी घाटात अवघड वळणावर परभणीकडे जाणारा डिझेलचा टॅंकर उलटला. त्यामुळे हजारो लिटर डिझेल रस्त्यावर वाहिले. डिझेल भरण्यासाठी स्थानिकांची झुंबड उडाली होती.
डिझेल घेवून जाणारा टँकर नगर-पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात अवघड वळणावर उलटला. यामुळे टँकरमधील डिझेलला गळती लागल्याने घाटात डिझेलचा पूर चालला होता.
आज सकाळी करंजी घाटातील अवघड वळणावर चालकांचा ट्रकवरील ताब्यात सुट्यानंतर टॅंकर रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झाला. त्यामुळे हजारो लिटर डिझेल रस्त्यावर सांडले.
यावेळी अनेकांनी ड्रम, बॉटल आणून रस्त्यावर वाहणारे डिझेल भरून नेले. डिझेल भरून नेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.घाटातील रस्ता डिझेलने ओला झाल्याने अनेक मोटारसायकलस्वार घसरून पडले.
काहींनी मास्क लावलेले होते तर काही बिगर मास्कचे डिझेल आपल्या ड्रम, बाटल्या मध्ये भरत होते, येणारे जाणाऱ्या प्रवाश्यांना याचा मोह आवरला नाही त्यांनीही डिझेल गोळा केले.
या अपघातात वाहनाचे चालक टॅंकरचालक बाळासाहेब गर्जे (रा. पाटसरा, ता. आष्टी) सुदैवाने बचावले असून.अपघाताचे वृत्त कळताच महामार्ग पोलीस व स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com